मुंबई, 1 – संजय राठोड यांच्या राजीनाम्या नंतर आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का ? या प्रश्नावर आमच्या पक्षाने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या प्रश्नावर थेट बोलणं टाळलं,मात्र मी ऑनलाइन कार्यक्रम घेतला तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला दुसरीकडे ते सत्ताधारी आहेत म्हणून जेसीबीने फुलांची उधळण करत लोक जमवूनही गुन्हा दाखल झाला नाही याला काय म्हणायचे असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली .
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली .या प्रकरणी राजकारण करू नये असे सांगत राठोड यांचा राजीनामा घेण्यास उशीर झाला असे सांगितले .या प्रकरणात सरकारला तातडीने तपास पूर्ण करावा लागेल असे त्या म्हणाल्या .
धनंजय मुंडे यांच्या बाबत प्रश्न विचारल्या नंतर पंकजा मुंडे यांनी मी अशा कोणत्याही गोष्टीच समर्थन कधीच करणार नाही,जे घडलं त्याबाबत संबंधितांनी स्वतः योग्य तो निर्णय घ्यावा अस म्हणत आमच्या पक्षाने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे असे सांगत धनंजय यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली .
वैधानिक विकास मंडळाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका चूक असल्याचे त्या म्हणाल्या .