बीड : ‘शिकलेली आई घर पुढे नेई’, अशी आपल्याकडे एक म्हणं आहे, अगदी या म्हणीप्रमाणेच खा. प्रीतमताईंचे नेतृत्व, दातृत्व आणि कृतर्र्र्ृत्व बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कामी येत आहे. कारण बीड जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्न आज त्यांच्या अभ्यासू नेतृत्वामुळे खर्या अर्थाने मार्गी लागले लागत आहेत आणि भविष्यातही ते मार्गी लागणार आहेत. त्यामुळेच एक दबंग, कणखर खासदार म्हणूनही आज प्रीतमताईंकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे शांत, संयमी आणि मृदूभाषेने ताईंचा राजकिय कसब सिध्द झालेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही, कोणताही गाजावाजा न करता त्यांनी विकासासाठी हाती घेेतलेले कार्य बीड जिल्ह्याला एक दिवस आदर्श बनविल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळेच तर जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला बीड रेल्वेचा प्रश्नही लोकनेत्या पंकजाताईंसह खा. प्रीतमताईंच्या माध्यमातून मार्गी लागत आहे. त्यांच्या नेतृत्वातच यंदाच्या अर्थसंकल्पातही केंद्राने बीड रेल्वे मार्गासाठी तब्बल 427 कोटी 63 लाख 88 हजार रूपयांच्या निधीस मंजूरी दिली आहे. हा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटत असल्यामुळे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनात खा. प्रीतमताईंनी आपुलकीचे घर निर्माण केले आहे. त्यामुळेच तर कोणत्याही संकटात लोकनेत्याच्या ह्या विकास कन्येची कधीच साथ सोडायची नाही, असा निर्धारच आता बीड जिल्ह्यातील अनेकांनी केला आहे. या लढवय्या नेतृत्वामुळेच खा. प्रीतमताई ह्या बीड जिल्ह्यासाठी एक मोठी ताकत असल्याचे स्पष्ट होत आहे.
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील एक बुलंद तोफ म्हणून स्व. गोपीनाथराव मुंडेंची ओळख होती, त्यांच्यामुळेच बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले, साहेबांमुळेच बीड जिल्ह्याचे नाव खर्या अर्थाने देशाच्या नकाशावर गेले, पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजाताईंनी समाजकारणाबरोबरच राजकारणात आगदी साहेबांप्रमाणेच स्वत:ची ओळख निर्माण केली, साहेबांच्या निधनानंतर लोकनेत्या पंकजाताईंनी प्रितमताईंना राजकारणात आणले, अगदी पहिल्या पाचच वर्षात खा. प्रीतमताईंनीही स्वत:चे कृर्तृत्व आपल्या कामातून सिध्द करून दाखविले. त्या जिल्ह्यासाठी खासदार लाभल्या हे जनतेचं मोठं भाग्यचं म्हणावे लागेल, रेल्वेचा आणि महामार्गांचा प्रश्न मार्गी लावून त्यांनी इतिहास घडवला असून अरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नावर विशेष लक्ष घालून त्यांनी अनेक जनहिताची कामे केली, राजकीय चष्म्यातून जर पाहिले नाही तर कधी कधी प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण पडत असेल जर मुंडे भगिनींचा राजकारणात जन्म झाला नसता तर नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न मुळात सुटलाच नसता, हे सत्य आहे की साठ वर्षे अनेकांनी संघर्ष केले. प्रसंगानुसार काहींनी त्यावर राजकारण केलं. मात्र यश कधीच मिळालं नाही, ज्यावेळी जिल्ह्याचा कारभार सत्तेच्या माध्यमातून पंकजाताई आणि खा.डॉ.प्रितमताई या कृर्तृत्वान भगिनीच्या हाती आला आणि रेल्वेचा प्रश्न एका फोनवर धडाक्यात मार्गी लागला. या प्रश्नासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त फोन केला अन् बघता बघता रेल्वेचा प्रश्न खर्या अर्थाने मार्गी लागला. सुदैवाने डॉ.प्रितमताई यांच्यासारखा जिद्दी आणि चिकाटीचा खासदार या प्रश्नाचा प्रशासकिय पातळीवर सतत पाठपुरावा करणारा मिळाला, आज जिल्ह्याच्या वेशीत रेल्वे आली आहे. राज्यात सत्तांतर झालं, मग हा प्रश्न रेंगाळत पडेल की काय?असं वाटत असताना लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवल्यानंतर याच प्रश्नाला हातात घेवून प्रितमताई संसदेत गेल्या, मागच्या वर्षी जाहिर झालेल्या अर्थसंकल्पातून त्यांनी तब्बल साडे चारशे कोटी रूपये तर यावर्षीच्या अर्थसंकल्पातून 427 कोटी 63 लाख 88 हजार रूपये या कामासाठी त्यांनी खेचून आणले, आता उर्वरीत कामाला निश्चित प्रगती मिळेल, हा प्रश्न जिल्ह्याचा एकही नागरिक विसरू शकत नाही, इतिहास जेव्हा लिहिल्या जाईल तेव्हा प्रितमताई नव्हे तर रेल्वेताई हे नामांतर करून मुंडे भगिनींच्या योगदानाशिवाय पहिलं पान लिहिल्याशिवाय इतिहास बांधताच येणार नाही, चांगलं नेतृत्व मिळणे यासाठी लोकांच भाग्य लागत, प्रितमताई म्हणजे विकासाची लक्ष्मीचं, बीड जिल्ह्यासाठी नगर-बीड-परळी हा रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा होता, पन्नास-साठ वर्षे या प्रश्नावर अनेकांनी संघर्ष केले, आंदोलन चालवले, स्व.गोपीनाथराव मुंडे जेव्हा 2009 ला खासदार झाले तेंव्हापासुन हा प्रश्न ऐरणीवर आला. रेल्वे बीडला आलीच पाहिजे यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. या कामासाठी राज्य सरकारचा 50 टक्के वाटा अशा प्रकारचा करार स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंडेंनी करून घेतला होता, मात्र पुढच्या काही दिवसांमध्येच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि डॉ.प्रितमताईंची जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झाली. मुंडे भगिनींंचं जिल्ह्यात येणं खर्या अर्थाने भाग्यच, पंकजाताई पालकमंत्री झाल्या आणि प्रितमताई खासदार. हा प्रश्न सुटावा हे स्वप्न मुंडेंचं होतं. या भगिनीनं पहिल्याच टप्यात हा प्रश्न हाती घेतला. केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबरोबर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने एका फोनवर या प्रश्नाला मंजुरी दिली. खरं म्हणजे ही ताकद कमी नाही. देशाचा पंतप्रधान बीडच्या रेल्वे प्रश्नावर फोन करतो हे परमभाग्य जनतेसाठी कामाला येतं ते केवळ नेतृत्वाच्या ताकदीमुळेच. त्याचं संपुर्ण श्रेय ह्या भगिनींना जातं. खासदार प्रितमताई एक जिद्दी आणि चिकाटी असणारं नेतृत्व आहे. त्यांनी सुरूवातीला या रेल्वे प्रश्नाचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आणि परिणाम बघता बघता चार-पाच वर्षात रेल्वे जिल्ह्याच्या शिवारात आली. प्रितमताईंचं नाव खरं तर रेल्वेताई होवून बसलं. जी गरज जिल्ह्याची होती तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत राजकिय संघर्ष झाला. तरीही त्या 1 लाख 68 हजार मतांनी विजयी झाल्या, मागील पाच वर्षात केलेल्या कामाच्या पुण्याईमुळे प्रितमताई पुन्हा खासदार झाल्या. सतत रेल्वे अधिकार्यांसोबत बैठका घेणं असेल किंवा कामाची पाहणी असेल त्यांचा स्वभाव संयमी असला तरी विकासाच्या प्रश्नावर त्या’ कडक आहेत, कठोर आहेत यातून दिसतं, राज्यात सत्तांतर झालं म्हणुन हा प्रश्न मागे पडतो की काय असे अनेकांना वाटलं. मात्र प्रितमताईनं जिल्ह्यात येवून रेल्वे कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला आणि पहिला रेल्वे अर्थसंकल्प जेव्हा जाहिर झाला त्यामध्ये 449 कोटी रूपयांची तर कालच्या दुसर्या अर्थसंकल्पात 427 कोटी 63 लाख 88 हजार रूपयांची तरतूद उर्वरीत कामासाठी झाली. निश्चितच कामाला वेग येईल आणि बघता बघता एखाद्या वर्षात झुक झुक गाडी नगरहुन निघुन बीडमार्गे परळीस्थित येईल. राजकारणात काम करताना विकासाची तळमळ असणारं नेतृत्व हवं, मुंडे भगिनींनी खर्या अर्थाने या जिल्ह्यात ते करून दाखवलं. पुरेपुर फायदा सत्तेचा घेवुन विकासाच्या प्रक्रियेत बीड जिल्हा हा पुढे घेवुन जाण्याचं काम खर्या अर्थाने पंकजाताई यांनी केलं. पालकमंत्री कसा असावा? जिल्ह्याचं राजकारण कसं करावं? सर्वसामान्य जनता आणि गोरगरीबांचं पालन कसं करावं? विकास करताना कुठल्याही प्रकारचं द्वेषाचं राजकारण न करता गोरगरीबांची सेवा कशी करावी? या सर्व गोष्टी पालकमंत्री म्हणून पंकजाताईच्या नेतृत्वातून पुढे आल्या आणि लोकांना दिसल्या. एक दुरदृष्टी आणि जनकल्याणाची र्हदयस्थ भावना त्यांच्याकडे आहे. राजकारणाचा भाग सोडा, मात्र जिल्ह्याच्या सुदैवाने अजुन पाच वर्षे जर पंकजाताईला मिळाली असती तर बीड जिल्हा हा निश्चितच सांगली, सातार्याच्या पंक्तीत जावून बसला असता. पण राजकारण हा ऊन-सावल्यांचा खेळ असतो. कधी कुणाचे दिवस येतील काहीच सांगता येत नाही, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील याचं स्वप्नसुद्धा त्यांना कधी पडलं नाही. पण ते आज पदावर आहेत. शेवटी राजकारण, क्रिकेट आणि पाऊस या मैदानावर कधी काय घडेल? याचं भविष्य कुणीच सांगू शकत नाही. बाकी काही असले तरी माझ्या जिल्ह्यात रेल्वे आलीच पाहिजे ही भीष्मप्रतिज्ञा करून दिल्ली दरबारात गेलेल्या खासदारांनी खेचुन आणलेला कोट्यावधींचा निधी हा या कामाच्या प्रगतीसाठी कमी नाही, राज्य सरकारच्या कराराप्रमाणे त्यांच्याकडुन पण निधी उर्वरीत येवू शकतो. यात कुठल्याही प्रकारची
शंका नाही. राजकारणात एखाद्या नेतृत्वाने प्रश्न धसास लावला तर तो विषय नेतृत्वाच्या भोवती फिरतो. तसंच काही म्हणताना प्रितमताईचं नाव खर्या अर्थाने रेल्वेताई ठेवलं तर अतिशयोक्ती वाटणार नाही. त्या होत्या, त्या आहेत आणि त्यांनी केलं म्हणुनच या मुंडे भगिनीला प्रश्नाचं श्रेय जातं. दुसरी बाजू श्रेय घेण्यासाठी सतत राजकारणात धडपडणारी माणसं असतात. फुकट नारळ कुणी देत नाही आणि फोडतही नाही. पण कोटीच्या कोटी उड्डाणे घेवुनसुद्धा या भगिनी श्रेय घेण्याच्या भानगडीत कधीच पडल्या नाहीत आणि यापुढेही कधीच पडणार नाहीत, दुसरं जावू द्या, राज्यात सत्तांतर झालं पण पंकजाताईनं जाता जाता बीड जिल्ह्यासाठी रस्त्यांसाठी आणलेला कोट्यावधींचा निधी आताचे सत्ताधार्यांकडून खर्च केला जात आहे. म्हणुनच कधी कधी या भगिनी राजकारणात नसत्या तर हे प्रश्न् मार्गी लागले असते का? ना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात हायवे आले असते? ना पंचेवीस पंधरा मागेल तेवढा आला असता का?, असा प्रश्न पडतो, कारण आताचे ग्रामविकास मंत्री किती निधी देत आहेत, हे सर्व जण आपल्या डोळ्याने पाहत आहेत. भविष्यात पाच पैसे जरी आले तरी परमभाग्य म्हणावे लागेल, असो, रेल्वेसाठी पुन्हा एकदा कोटीची उड्डाणे घेणार्या जिल्ह्याच्या रेल्वेताईच्या कर्तृत्वाला वाढदिवसानिमित्त सलाम, मागच्या साडे सहा वर्षात त्यांनी जिल्ह्यात एकूण आकरा महामार्ग मंजूर करून कामे चालू केली, रस्ते प्रगतीमध्ये बीड जिल्हा मराठवाड्यामध्ये अघाडीवर आहे, गोरगरीब जनतेसाठी महाअरोग्य चळवळ उभा करुन खा. प्रीतमताईंनी लोकांची सेवा केली, जि. प. शाळेचा दर्जा सुधारावा यावर लक्ष घातले, त्यांचे काम आणि भुमीका सकारात्मक असल्याने लोक त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात, संसदेत शेतकर्यांच्या प्रश्नावर त्या नेहमीच अवाज उठवतात, गोरगरिबांच्या दुखात त्या सदैव धावून जातात, एखाद्याचं वाटूळ करण्यामध्येच अनेक राजकारणी धन्यता मानतात, असलं राजकारण मात्र खा. प्रीतमताईंच्या स्वभावात नाही, त्या सदैव लोकांचा चांगल्या दृष्टीने विचार करतात, आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावतात, अगदी मुंडे साहेब आणि पंकजाताई यांच्याप्रमाणेच काम करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. पहिल्या टर्ममध्ये रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, पासपोर्ट कार्यालय यासह अन्य महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले, त्यानुसारच आता दुसर्या टर्ममध्येही त्या मोठ्या गतीने काम करीत आहेत. लोकनेत्या पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली आज खा. प्रीतमताई दुसर्यांदा दिल्लीत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. खा. प्रीतमताईंच्या दुसर्या टर्मला जवळपास दिड वर्ष पुर्ण झाले आहे. दुसर्या टर्ममध्ये त्यांच्यात प्रचंड आक्रमकता पहायला मिळत आहे. आक्रमक होवूनच बीड, मराठवाड्याबरोबरच राज्यातील अनेक महत्वाचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले, प्रत्येक प्रश्न उपस्थित करताना त्यांनी आपल्या मुद्दयांकडे लोकसभेच्या अध्यक्षांबरोबरच प्रत्येक खासदारांचे लक्ष वेधून घेतले. ज्याप्रमाणे दिल्लीपासून गल्लीपर्यंत मुंडे साहेबांचा दरारा कायम होता, अगदी आजही तोच दरारा खा. प्रीतमताईंच्या माध्यमातून संसदेत कायम दिसून येत आहे. ज्या वेळी ज्या वेळी खा. प्रीतमताईंनी संसदेत प्रश्न उपस्थित केले त्या त्यावेळी बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला लोकनेते गोपीनाथराव मुंडेंची आठवण झाली. वास्तविकता खा.प्रीतमताईंनी संसदेत मांडलेले अनेक प्रश्न तडीस लागले आहेत. प्रश्न कोणत्याही वर्गातील असो खा. प्रीतमताई त्यावर लक्ष केंद्रीत करून तो प्रश्न सोडवून घेतात, त्यांच्या एका आवाजामुळे शेतकर्यांचे प्रश्नही अगदी सहजपणे मार्गी लागत आहेत. त्यांनी दुसर्या टर्ममध्ये बीडसह मराठवाड्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविला, जलयुक्त शिवार योजना मराठवाड्यासह राज्यासाठी किती महत्वाची ठरली हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले. मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड प्रोजेक्टवरही त्या संसदेत आक्रमक झाल्या होत्या. तसेच शेतकरी व शेतमजूरांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण देण्याची प्रभावी मागणीही त्यांनी संसदेत लावून धरली. रेल्वेच्या तिर्थ आराखड्यामध्ये परळी रेल्वे स्थानकाचा समावेश त्यांच्याच मागणीनुसार झालेला आहे. ज्या प्रमाणे मुंडे साहेबांनी आक्रमक होवून संसदेत कारकिर्द गाजवली, अगदी त्याचप्रमाणे खा. प्रीतमताईंनी मराठा आरक्षण व ओबीसी जणगनेविषयी संसदेत प्रभावी भुमिका मांडली, धनगर आरक्षणासाठीही त्यांनी दिल्लीत आपला पाठपुरावा कायम ठेवला, विद्यार्थी, महिलांबरोबरच शेतकर्यांच्या प्रश्नावरही त्या सदैव आक्रमक राहिल्या, त्यांनी संसदेत आवाज उठविल्यामुळेच बीड जिल्ह्यात कापूस, तूर आणि हरभर्याचे खरेदी केंद्र सरकारला सुरू करावे लागले, खा. प्रीतमताईंमध्ये दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व हे तिन्हीही गुण आहेत. त्यामुळेच या दुसर्या टर्ममध्ये त्यांना अबुधाबीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यावरण संसदेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास संधी मिळाली, त्या स्वत: एक डॉक्टर आहेत, त्यांनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराचीही बीड जिल्ह्याला मोठा फायदा झालेला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या सर्व कामाची दखल घेवूनच सुरूवातीला सर्वाधीक प्रभावी खासदारांमध्ये (25) त्यांचे नाव फेम इंडिया एशिया पोस्टने आपल्या सर्वेमध्ये नोंदविले, तर पार्लिमेट्ररी कमीटीने केलेल्या सर्वेत त्यांचे नाव टॉप टेन खासदारांमध्ये आहे. बीड जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी संकट आले त्यावेळी खा. प्रीतमताईंनी रस्त्यावर उतरून काम केले, आणि सध्याही त्या धडाडीने करत आहेत. 2020 या वर्षात त्यांनी बंजारा समाजाच्या भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यासाठी आक्रमता दाखविली, युपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या, बीडसह मराठवाड्याच्या पाण्यासाठी थेट योजना राबविण्यासाठी केंद्राकडे मागणी लावून धरली, परळीतून रेल्वेने प्रवास करणार्या प्रवासांचा प्रश्न सोडविला, जिल्ह्यातील गडांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली, शेतकर्यांच्या प्रश्नावर संसद तर गाजवलीच त्याचबरोबरच विरोधकांनाही धारेवर धरले, दुष्काळ असो की अतिवृष्टी खा. प्रीतमताईंनी नेहमीच बांधावर जावून शेतकर्यांचे अश्रू पुसले, कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास सरकारला भाग पाडले, ऊसतोड कामगारांसाठी आक्रमकपणे काम करून त्यांना न्याय मिळवून दिला, मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत प्रभावीपणे मांडला, याचबरोबरच न्यायालयाची भुमिका स्पष्ट होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्व सवलती देण्याची मागणीही केली, बीडचे प्राप्तीकर कार्यालय पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी अर्थ मंत्र्यांना भेटल्या, दुधाच्या प्रश्नावर आक्रमक भुमिका घेतली, डीसीसीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या पाठीशी ताकत उभी केली, विम्याच्या प्रश्नाकडे सातत्याने मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधानांचे लक्ष वेधले, शिक्षकांच्या मदतीसाठीही सातत्याने धावून आल्या, जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी लावून धरली, तूर, हरभरा उत्पादकांचे प्रश्न सरकारच्या कानावर घातले, फळबागायतदारांना न्याय मिळवून दिला, शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास यश मिळविले, महिला अत्याचाराच्या विरोधात त्या थेट रस्त्यावर उतरल्या, वास्तविक पाहता 2020 हे वर्ष बीडच काय तर संपूर्ण जगासाठी संकटाचे ठरले, कारण या संपूर्ण वर्षभरात कोरोनाने नागरिकांचे जगणे अक्षरक्ष: मुश्किल केले, वर्षभरातील या संकटातही खा. प्रीतमताई जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यातील नागरिकांच्या मदतीला धावून आल्या, आणि यापुढेही त्या येणारच आहेत. कोरोनाच्या या संकटात थेट कोरोना वार्डात जावून रूग्णांशी संवाद साधणे त्यांच्या अडचणी तात्काळ सोडविणार्या त्या पहिल्याच खासदार ठरल्या, यावेळी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हावासियांनी माणसातला देवच पाहिला, या काळात त्यांनी गोरगरिबांपर्यंत मोफत राशन पोहचविण्याचे मोठे काम केले, पीएम केअर फंडातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हेटिलेटर उपलब्ध करून दिले. यादरम्यान प्रशासनाकडून काम तर करूनच घेतले मात्र याबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांना मोठा आधार देण्याचेही काम त्यांनी यावेळी केले. या कोरोनाच्या संकटात त्यांनी आपला एक कोटींचा खासदार फंड आणि एक महिण्याचे वेतन दिले, तसेच पीएम केअर फंडमध्येही मोठ्या प्रमाणात निधी पाठविण्यास त्यांना यश आले. खा. प्रीतमताई ह्या अत्यंत चाणक्य, हुशार, प्रमाणिक आणि विकासाची दृष्टी असणार्या एक धाडसी आणि आक्रमक नेत्या आहेत, त्यांच्या नेतृत्वाची, कृर्तृत्वाची आणि दार्तृत्वाची खर्या अर्थाने बीड जिल्ह्याला गरज आहे, याची जाणीवही संपूर्ण जिल्हावासियांना आहे, संघर्ष कन्या पंकजाताईंच्या मुशीत राजकिय प्रवास सुरू करणार्या प्रीतमताई या आक्रमक तर आहेतच त्याचबरोबर त्या धैर्यवानही आहेत, याचाच फायदा त्यांना पुढच्या राजकिय वाटचालीत होणार आहे, कारण त्यांचे पिता स्व.गोपीनाथराव मुंडे हे नेहमी धैर्य ठेवून संघर्ष करायचे आणि त्यांना यशही मिळायचे, जसा पंकजाताईंमध्ये साहेबांचा संघर्षाचा गुण आहे तसा धैर्याचा गुण हा प्रीतमताईंमध्ये आहे. याची जाण परिवारातील अप्तसोयीकांसह राजकारणातील छोटट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आहे. हाच त्यांचा स्वभाव बीड जिल्ह्यातल्या अबाल वृध्दांना आपलसं करतो, त्यामुळेच संपूर्ण बीड जिल्हा आज ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही तेवढ्याच ताकतीने उभा राहिल असे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील अनेक जण बोलून दाखवित आहेत.
धाडसी आणि आक्रमक
नेतृत्वाचा उदय
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या खा. प्रीतमताई मुंडे ह्या व्दितीय कन्या आहेत, त्या अत्यंत संयमी आणि शांतप्रिय स्वभावाच्या नेत्या आहेत. आपल्या वडिलाप्रमाणेच जनसमान्यांचे प्रश्न जाणून घेत लोकसभेत त्या सातत्याने आपला आवाज उठवित आहेत. यातून जिल्ह्याचे महत्वाचे प्रश्न खर्या अर्थाने मार्गी लागत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या माध्यमातून एक धाडसी आणि आक्रमक नेतृत्वाचा उदय झाला आहे, ही बीड जिल्ह्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.
पंकजाताईंची खा. प्रीतमताईंना खंबीर
साथ
खा. प्रीतमताई ह्या लोकनेत्या पंकजाताईंच्या नेतृत्वावर काम करीत आहेत. खा. प्रीतमताईंनी पंकजाताईंनाच राजकारणातील आपले गुरू मानलेले आहे. पंकजाताईंच्याच नेतृत्वावर आणि मार्गदर्शनाने त्या आज बीड जिल्ह्यात धडाडीने काम करीत आहेत. गोरगरिबांचे प्रश्न मांडून ते तडीसही लावत आहेत. या जनविकासाच्या कामामुळेच बीड जिल्ह्यातील जनता आज ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, आणि येणार्या काळातही खंबरीपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे.
बीडप्रमाणेच सोलापुर-जळगाव रेल्वे
मार्गासाठी ताईंची भुमिका ठरतेय महत्वाची
खा. प्रीतमताई ह्या पहिल्या टर्मपासूनच नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी स्वत:ला झोकून देवून काम करीत आहेत. यामुळेच या मार्गासाठी त्यांना केंद्राकडून 2020 मध्ये तब्बल 449 कोटींची तर 2021 मध्ये 427 कोटींची तरतूद करून घेण्यास मोठे यश मिळाले, या मार्गाबरोबरच आता त्यांनी सोलापुर जळगाव या रेल्वे मार्गाकडेही आपले लक्ष वेधलेले आहे. त्याअनुषंगानेच त्यांनी याही मार्गाला तात्काळ निधी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे लावून धरलेली आहे. त्यामुळे बीडप्रमाणेच याही रेल्वे मार्गासाठी ताईंची भुमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे.
देशातील टॉप टेन खासदारांमध्ये
ताईंच्या नावाची नोंद
अगदी स्व.गोपीनाथराव मुंडे आणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याप्रमाणेच खा. प्रीतमताई मुंडे ह्याही धडाडीने काम करीत आहेत. खासदारकीच्या दुसर्या टर्ममध्ये लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रीतमताइर्ंमध्ये प्रचंड प्रमाणात आक्रमता दिसून येत आहे. त्यांच्या या कामाची दखल केंद्राच्या प्रगती पुस्तकाने घेतलेली आहे. त्याचबरोबर पार्लियामेंट्री बिजनेस कमिटीने केलेल्या सवर्र्ेेमध्ये ताईंनी देशातील टॉप टेन खासदारांमध्ये पाचवे स्थान मिळविलेले आहे. त्यानुसार खा. प्रीतमताई आता ज्येष्ठ आणि दिग्गज खासदारांनीही कामात भारी पडू लागल्या असल्याचे यावरून दिसून येत आहे.