अंबाजोगाई

एटीएम कार्डची अदलाबदल करुन 1 लाख 44 हजारांची रक्कम लांबवली!



अंबाजोगाई ।
जिल्ह्यात एटीएम आधारे नागरिकांच्या रकमा परस्पर विड्रॉल करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अंबाजोगाई शहरातही असाच प्रकार समोर आला आहे. एटीएम सेंटर रक्कम विड्रॉल करण्यासाठी आलेल्या एका नागरिकाचे एटीएम कार्डची अदलाबदल करुन चोरटयाने त्या कार्डाद्वारे नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 44 हजारांची रक्कम काढून घेतली या प्रकरणी शहर ठाण्यात गुरुवारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीसांच्या माहितीनूसार, 5 जानेवारी रोजी सायं.6.30 वाजेच्या सुमारास शहरातील एसबीआय मेडीकल परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी रागिणी देविदास पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती देविदास शंकर पवार हे मंगळवारी सायंकाळी मेडिकल परिसरातील एटीएम सेंटरवर रक्कम काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या एटीएम कार्डाआधारे खात्यातून साडेनऊ हजाराची रक्कम विड्रॉल केली. याचवेळी तिथे असलेल्या अज्ञाताने पवार यांचे एटीएम कार्ड चोरुन घेत त्या ठिकाणी दुसरे एटीएम कार्ड ठेवून पोबारा केला. नंतर त्याच एटीएम कार्डाद्वारे एटीएम मशीन तसेच पेट्रोलपंपावरुन पवार यांच्या खात्यातून 1 लाख 44 हजाराची 760 रुपयांची रक्कम विड्रॉल केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुरुवारी रागिणी पवार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!