देश विदेश

सॅमसंग बनवणार मेड इन इंडियाचे स्मार्टफोन

व्हिएतनाममधील उद्योग भारतात आणणार


दिल्ली, दि.18 (लोकाशा न्युज) ः जगभरातील स्मार्टफोन निर्मात्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वीच अ‍ॅपल चीनमधील आपला उद्योग भारतामध्ये स्थलांतरित करण्याचा विचार करत असल्यासंदर्भातील वृत्त समोर आलं होतं. अशाप्रकारे आता मूळची दक्षिण कोरियामधील सॅमसंग ही स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनीनेही परदेशातील उद्योग भारतामध्ये हलवण्यासंदर्भात विचार सुरु केला आहे. यासंदर्भात इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार व्हिएतनाममधील सॅमसंग त्यांच्या सध्याच्या व्हिएतनाममधील स्मार्टफोन निर्मितीचा मोठा हिस्सा भारताबरोबरच अन्य काही देशांमध्ये स्थलांतरित करणार आहेत. सॅमसंग भारतामध्ये 40 बिलीयन डॉलर्सचे म्हणजेच 3 लाख कोटींचे स्मार्टफोन निर्माण करण्यासाठी युनिट सुरु करण्यासंदर्भातील हलचाली करत आहे.या व्यवहाराशी संबंधित व्यक्तीने ईटीला दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग कंपनी भारतामध्ये स्मार्टफोन निर्मितीसाठी पीएलआय म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टीव्ह योजनेअंतर्गत काम करणार आहे. यामुळे सध्या व्हिएतनाबरोबरच इतर देशांमध्ये सुरु असणारा निर्मिती उद्योग कंपनी भारतामध्येच करण्याची दाट शक्यत आहे. सध्या जगभरामध्ये सर्वाधिक स्मार्टफोन निर्यात करणार्‍या देशांच्या यादीमध्ये चीन खालोखास व्हिएतनामचा क्रमांक लागतो. नवीन पीएलआय योजनेअंतर्गत सॅमसंगने हा निर्णय घेतल्याचे या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ सांगतात. भारतामध्ये सुरु करण्यात येणार्‍या या कारखान्याच्या माध्यमातून प्रामुख्याने 200 डॉलरपर्यंत किंमत असणार्‍या स्मार्टफोनची निर्मिती केली जाईल. 40 बिलीयन डॉलर्सपैकी 25 बिलीयन डॉलर्सचा वाटा हा 200 डॉलर किंमत असणार्‍या स्मार्टफोनचा असेल. यापैकी सर्वच फोन हे भारताबाहेर निर्यात केले जातील अशी माहिती एका सरकारी अधिकार्‍याने दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!