देश विदेश

उद्योगपती मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट; चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानी घसरण

मुंबई, दि.18 (लोकाशा न्युज) ः गेल्या काही आठवड्यांत जगातील श्रीमंतांच्या यादीत अतिशय वेगानं पुढे सरकरणार्‍या उद्योगपती मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट झाली आहे. त्यामुळे ते चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानी घसरले आहेत. तर टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. ते सध्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. मुकेश अंबानींनी काही दिवसांपूर्वीच यादीत चौथंस्थान पटकावलं होत. गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे शेअर घसरत आहेत. त्यामुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीचं मूल्यदेखील घसरलं आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या संपत्तीचं मूल्य 78.8 अब्ज डॉलर इतकं आहे. अंबानींच्या संपत्तीचं मूल्य कमी होत असताना टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!