परळी: तालुक्यात सध्या रस्त्याचे काम चालू असून या अर्धवट कामाच्या कारणामुळे आज प्रसिध्द डॉ.वाल्मिक मुंडे यांचा कार नालीच्या पाईपाला धडकून अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक डॉ.जखमी झाले असून त्यांना स्वारातीमध्ये दाखल करण्यात आले असून हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
जिरेवाडी बायपास रोडवर गावा लगत एका ठिकाणी नाला पुलाचे काम चालू असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत. यामुळे वाहन चालविताना अनेक अडचणी येत आहेत. या रस्त्यावरून डॉ प्रवीण खाडे व डॉ.वाल्मीक मुंडे हे दोघेजण कारने जिरेवाडी रविवारी रात्री अकराच्या सुमारास येत होते. नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार रस्त्यावरील पाईपला धडकुन खाली खड्ड्यात कोसळली. त्यात डॉ. वाल्मीक मुंडे यांचा मृत्यू झाला. तर डॉ. खाडे हे जखमी झाले आहेत.
डॉ वाल्मीक मुंडे हे नाममात्र दरात रुग्णांची सेवा करीत होते त्यामुळे परळी व परिसरात ते लोकप्रिय झाले होते. त्यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील नागापूर जवळील वानटाकळी हे आहे .डॉ. मुंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे .