बीड, आम्ही महागाईवर बोलू लागलो की, मोदी हिंदू खतरे मैं है म्हणता. तुमचे हिंदुत्व हिंदुत्व नाही तर गोरगरिबांची घरे पेटवणारे आहे, अशी घणाघाती टिका सुषमा अंधारे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप सभेत उपनेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या, लोकनेते मुंडे राहिले नाहीत, युती राहिली नाही अन् भाजपा सुद्धा पहिल्या सारखा राहिला नाही. भाजपने स्व. विनायकराव मेटे यांचा वापर करून घेतला, जानकर यांचा वापर केला, खोत यांचा वापर करून घेतला. आता सेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटाला वापरून घेत आहेत. महप्रबोधान यात्रा कोणावर टीका करण्यासाठी नाही तर जातीयवाद, धर्मांधता पसरवणाऱ्या भाजपच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे. 450 चे गॅस सिलेंडर 1200 रुपयावर गेले. 30 रुपये किलो मिळणारे पाम तेल 175 रूपयांपेक्षा अधिक झाले. आम्ही महागाईवर बोलू लागलो की मोदी हिंदू खतरे मै है, सांगतात. आम्हाला मोफत काही नको, अंदाचा सिधा नको, मोफत बस तिकीट नको. बाराशेचा गॅस 350 रुपयात देणार आहात का? हे सांगा. लोकांचे मूळ प्रश्न बाजूला ठेवून लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून भाजप दंगली घडवत आहे. त्रिंबकेश्वर मंदिर असे वाद उकरून काढत आहेत. केंद्रात मोदी फेकत राहतात अन् महाराष्ट्रात फडणवीस खोटे बोलतात, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी भाजपा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला.
जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, बीड जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकत आहे. यामुळे शिवसेनेची मशाल हाती घेवून बीड जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवणार असल्याचे सांगत मिंदे गटाचे चारपाच चिल्लर लोक चुळबुळ करतात. त्यांची चुळबुळ जास्त काळ टिकणार नाही, असे जगताप म्हणले. तत्पूर्वी प्रस्ताविकात सुनील धांडे म्हणाले, मिंधे सरकारला जाब विचारून धडा शिकवण्यासाठी महप्रबोधन यात्रा काढली आहे. गद्दार बेईमान झाले तरी बीड जिल्हा ठाकरेंच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे धांडे म्हणाले.
यावेळी संजय राऊत, चंद्रकांत खैरे, संपदा गडकरी, बदामराव पंडित, अनिल जगताप, राजू वैद्य, युधाजित पंडित, विलास महाराज शिंदे, सुदर्शन धांडे, सुनील सुरवसे, बाप्पासाहेब घुगे, गोरख सिंगण, नितीन धांडे, रतन गुजर, हनुमान जगताप, संगीता चव्हाण, निजाम शेख, परमेश्वर सातपुते, विनायक मुळे,
यांच्यासह शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
चौकट….
लाव रे तो व्हिडिओ म्हणत सूषमा अंधारेनी उडवली मोदींची खिल्ली
महागाईवर 2014 पूर्वी पंत्रधान मोदी बोलत होते अन् आज काय बोलतात? असे सांगत लावरे तो व्हिडिओ म्हणत, तीन – व्हिडिओ धाखवत अंधारे यांनी पंतप्रधान मोदी यांची चांगलीच खल्ली उडवली.