Uncategorized

झेडपीच्या ग्राम पंचायतमधील आठरा जणांच्या बदल्या


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : झेडपीच्या पंचायत विभागाअंतर्गत येणार्‍या अठरा अधिकार्‍यांच्या बदल्या सीईओ अजित पवार यांनी काल केल्या. यामध्ये विस्तार अधिकारी कल्याण शेळके यांची बीडवरून माजलगावला प्रशासकिय बदली करण्यात आली आहे. तसेच गोविंद गित्ते, बलभीम रोडगे, रमाकांत पवार, श्रीकांत मोरे या चार ग्रामविकास अधिकार्‍यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. तर अयोध्या शिंदे, नितीन गित्ते, भास्कर शिंदे या तीन ग्रामसेवकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. याबरोबरच आणखी दहा जणांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर मोकाटे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.गर्जे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!