परळी ।
परळीसह बीड जिल्ह्यात मटका चालवणारा परळीचा मटका किंग संतोष गोविंदलाल नावंदर रा. परळी याच्या मटका आड्यावर पोलिसांनी रात्री छापा टाकला यावेळी 3 एजंट सह नावंदर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठा मुद्देमालही जप्त करण्यात आली. ही कारवाई पंकज कुमावत यांच्या पथकाने केली. मटका किंग संतोष रावंदर हा परळीतून मटका चालवत होता. पंकज कुमावत यांचे पथक त्याच्यावर नजर ठेवून होते. परळीती गणेशपार नगरमध्ये त्याच्या घराच्या बाजूला तो मटका घेत असून तेथे इतर लोक मटक्याचे आकडे लिहीत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगाराचे साहित्य असा एकूण 76 हजार 550 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केली. पोलिस नाईक दिलीप चंद्रभान गिते यांच्या फिर्यादीवरुन संभाजीनगर पोलिस ठाण्यात 17 आरापीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.