केज दि.२८ – तालुक्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर विजेच्या कडकडाटासह गारा पडल्या आणि या विजेच्या कडकडाटामध्ये तालुक्यातील केळगाव शिवारात वीज पडून एका 48 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.
केज तालुक्यातील केळगाव येथे दुपारी बाराच्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट सुरू झाला. यामध्ये वीज कोसळून बिबीशन आण्णासाहेब घुले वय 48 वर्षे या इसमाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट ही झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यापूर्वीही झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र जे काही उरले होते ते आजच्या गारपिटीने पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.