बीड – जिल्हाभरातून जिल्हा परिषद व्यवस्थापना च्या शाळांमधील इयत्ता 5 ते 8 वी तील 33 विद्यार्थी विद्यार्थी व 8 काळजीवाहक अधिकारी दिनांक 17 एप्रिल 2023 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत होणाऱ्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ISRO दौऱ्यासाठी दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता जिल्हा परिषद प्रांगण बीड येथून पुण्याकडे रवाना झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या इयत्ता 5 ते 8 वीच्या विद्यार्थ्यां साठी ISRO शैक्षणिक अभ्यास दौरा 2023 साठी जिल्हास्तरा वरुन सर्व नियोजन सुरू होते. या सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड 3 स्तर (केंद्र ,तालुका व जिल्हा) परीक्षेद्वारे करण्यात आलेली आहे.
एकूण 22276 विद्यार्थ्यांमधून केंद्रस्तर , तालुकास्तर, आणि जिल्हास्तर अशा 3 परीक्षा यशस्वी पणे पार पाडणाऱ्या गुणवत्ता धारक 33 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थी विश्वेश्वरय्या म्युझियम, बेंगलोर, विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ISRO, थुंबा तिरुअनंतपुरम येथील रॉकेट लॉन्चिंग, प्राणी संग्रहालय तिरुअनंतपुरम आणि कन्याकुमारी अशा ठिकाणी जाणार आहेत व प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.
या सहलीला शुभेच्छा देण्यासाठी मा.नंदकुमार ठाकूर जिल्हा पोलीस अधीक्षक, बीड व मा. अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांनी सर्व विद्यार्थी यांना शुभेच्या दिल्या तसेच प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थी युवराज सानप व भाविका फड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालक, शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सहलीसोबत मार्गदर्शक व काळजीवाहक म्हणून श्री. वासुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड, श्रीकांत कुलकर्णी शिक्षणाधिकारी (प्रा.), जिल्हा परिषद, बीड, अजयकुमार बहिर, उपशिक्षणाधिकारी (प्रा.), जिल्हा परिषद, बीड, सुधाकर यादव, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, आष्टी, डॉ. वासंती चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, अंबाजोगाई, राहूल चाटे, इस्त्रो/नासा शैक्षणिक अभ्यास दौरा जिल्हा समन्वयक,जिल्हा परिषद, बीड, कैलास पवार व श्रीमती उषा लव्हारे हे सोबत रवाना झाले आहेत.
सर्व विद्याथी प्रत्यक्ष रॉकेट लौंचिंग बघणे व पहिल्यांदा विमानाने जाण्यासाठी आतुर झाले आहेत. या टूर मुळे विद्याथी यांच्या मध्ये स्पर्धा परीक्षा आवड व शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होईल
वासुदेव सोळंके.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद बीड