बीड, झेडपीचे सीईओ अजित पवार हे एखादे काम हाती घेतल्यास ते तडीसच लावतात, त्यानुसार नव्या आर्थिक वर्षी म्हणजेच एक एप्रिल रोजी जिल्हा परिषदेची मुख्य इमारत आणि या इमारतीच्या परिसरात श्रमदान करण्याचा संकल्प त्यांनी केला होता, यासाठी त्यांनी एक पत्र काढून सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी या श्रमदानात सहभाग घ्यावा असे आवाहन केले होते, त्यानुसार आज सकाळी 7 ते 10 या वेळेत झेडपीच्या आवारात श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्यात आला, स्वतः सीईओ अजित पवार, एसीईओ वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे, केकान, कॉफ्फो जठाले, कार्यकारी अभियंता सुनील चांद्वाडकर, नारेगाचे बीडीओ सचिन सानप, शाखा अभियंता पवार यांच्यासह आदींनी हातात टोपले, फावडे घेऊन स्वच्छता केली, ज्या ठिकाणी झेंडा फडकवला जातो त्या ठिकाणी लाल मुरूम ही टाकण्यात आला, सीईओ अजित पवार यांनी हाती घेतलेल्या या श्रमदानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.