Uncategorized

पाटोद्याच्या भोंडवे परिवारावर काळाचा घाला ; पंकजाताई मुंडे यांनी केला शोक व्यक्त, बीड जिल्हा एका समाजसेवकाला मुकला

बीड ।दिनांक २१।
दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते सुदाम काका भोंडवे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांचा आज झालेल्या एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, एका सामाजिक कार्यकर्त्यांचं असं अचानक जाण वेदनादायी आहे, त्यांच्या निधनानं जिल्हा एका समाजसेवकाला मुकला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

सुदाम काका भोंडवे हे पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील दीनदयाळ शोध संस्थानच्या गुरूकुलचे संचालक होते. या माध्यमातून त्यांचे वंचित, पिडित घटकांसाठी मोठे कार्य सुरू होते. मी अनेकदा गुरूकुलला भेट देऊन त्यांचे काम जवळून पाहिले आहे, त्यांच्यासहित त्यांच्या पत्नी सिंधू काकू,नात आनंदी ,व सुनबाई कार्तिकी यांचे भीषण अपघातात दुःखद निधन व मुलगा आश्विन जखमी आहे. काळानं अशा प्रकारे त्यांच्या परिवारावर घातलेला घाला खूप वेदनादायी आहे, या दुःखात मी सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो अशा शोकाकुल भावना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!