परळी वैजनाथ ।दिनांक १८।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना उपवासाच्या खिचडीचे वाटप केले.
नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मोफत खिचडी वाटपाचा स्टाॅल उभारण्यात आला होता. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे व कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. सकाळी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पंकजाताईंनी स्टाॅलला भेट दिली व खिचडी वाटपाचा शुभारंभ केला. स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या भाविक भक्तांनी या खिचडीचा लाभ घेतला, यावेळी पंकजाताईंनी स्वतः देखील खिचडीचा लाभ घेऊन या उपक्रमाचे कौतुक केले तसेच सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
••••















