Uncategorized

परळीत येताच पंकजाताई मुंडेंनी केले ‘त्या’ तीन युवकांच्या कुटुंबियांचे सांत्वन, भराडिया, धोकटे, कांदे परिवाराला दिला धीर

परळी वैजनाथ ।दिनांक १७।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी शहरात आल्या आल्या ‘त्या’ तीन युवकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. भराडिया, धोकटे व कांदे परिवाराच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.

शहरातील व्यंकटेश कांदे,रोहित भराडीया व शुभम धोकटे या तीन युवकांचा नुकत्याच झालेल्या एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज संध्याकाळी पंकजाताई शहरात आल्या, स्वतःच्या घरी न जाता त्यांनी थेट त्या तीन युवकांचे घर गाठून त्यांचे आई, वडिल आणि परिवाराचे सांत्वन केले. आपल्या परळीतील ऐन उमेदीतल्या तरुणांचे असे जाणे व्यथित करणारे आहे, या दुःखातून तीनही परिवार अजून सावरलेला नाही, आपले दुःख खूप मोठे आहे अशा शब्दांत त्यांनी या युवकांच्या कुटुंबियांनी धीर दिला. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, किशोर केंद्रे, शाम तोष्णीवाल, राहूल केंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!