Uncategorized

परळीतील ‘त्या’ युवकांच्या अपघाती निधनामुळं पंकजाताई मुंडे झाल्या व्यथित, कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

परळी वैजनाथ ।दिनांक १२।
शहरातील तीन उमद्या तरूणांचे शनिवारी एका रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले, ही बातमी कळताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया व्यथित झाल्या आहेत. या तरूणांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

पंकजाताई मुंडे यांनी या घटनेबद्दल फेसबुक पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे, त्यांनी म्हटले आहे की,
व्यंकटेश कांदे,रोहित भराडीया व शुभम धोकटे या तीन युवकांचा लातूरहुन परळीला परतताना भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.आपल्या परळीतील ऐन उमेदीतल्या तरुणांचे असे जाणे व्यथित करणारे आहे, परळी स्तब्ध आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!