परळी वैजनाथ दि २१ (लोकाशा न्युज) :- परळी शहरातील शिवाजीनगर भागात घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत
घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचा ऐवज व नगदी असा दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील थर्मल रोड शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेले अमरलाल पुरणलाल परदेशी यांनी संभाजी नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून २१ हजार रुपयांची सोन्याचे दागीने व १ लाख २२ हजार नगदी रोख रक्कम असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून घेवुन गेले आहे.
या प्रकरणी परदेशी यांच्या फिर्यादीवरून संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुरन २४७ / २०२२ कलम ४५४,४५७, ३८० भादवी नुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नारायण गित्ते करीत आहेत.