Uncategorized

चंपालालजी डुंगरवाल यांचे दुःखद निधन, सामाजिक सेवाभावी रत्न निखळले


लोकाशा न्यूज
बीड शहरातील प्रतिष्ठित तथा सामाजिक व्यक्तिमत्व चंपालाल डुंगरवाल यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले . वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला .
जुना मोंढा येथील रहिवाशी साखरेचे प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक धार्मिक व दातृत्व सिद्ध असलेले चंपालालजी डुंगरवाल हे जैन दिवाकर या संस्थेचे संचालक होते, तथा जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष होते . आयुष्यात परोपकार अध्यात्म व दानशूरता हे त्यांच्या जगण्याचे मापदंड राहिलेले आहेत . त्यांच्या स्नायूंच्या आजारावर शस्त्रक्रिया झालेली होती . महावीर रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांचे निधन सृजनशील समाजाची न भरून निघणारी हानी आहे , त्यांच्या आजीवन प्रवासाची प्रेरणा घेऊन सामाजिक तत्वाची आठवण म्हणून ते कायम सामान्य मनात राहतील अश्या प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत .
काही वर्षांपूर्वी त्यांच्या विजयाबाई डुंगरवाल यांचे दुःखद निधन झालेले आहे.
शांतीलाल जी यांच्या पश्यात मुलगा गौतम डुंगरवाल सतीश डुंगरवाल मुलगी नीता मूथा जालना असा परिवार आहे . त्यांना अंतिम निरोप सायंकाळी 4 .00वाजता तर सायंकाळी 6.30 वाजता बहिरवाडी येथील शेता मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील . डुंगरवाल परिवाराच्या दुःखात बंब व लोकाशा परिवार सहभागी आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!