Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ; पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाचा भाजपत प्रवेश, पंकजाताई मुंडे यांनी केले प्रवेशाचे स्वागत ; उजनी येथील साहेबराव मानेही भाजपात

परळी वैजनाथ ।दिनांक २९।
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. तालुक्यातील परचुंडीचे सरपंच बाळासाहेब थोरात आणि उजनीचे कार्यकर्ते साहेबराव माने यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या प्रवेशाचे स्वागत केले आहे.

तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची जोरदार तयारी सुरू आहे. परचुंडीची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, तेथील विद्यमान सरपंच बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून या निवडणूकीत पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेत आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. थोरात यांचेसह श्रीराम फताळे, पंपू रूपनर, विकास थोरात, फुलचंद थोरात, महादेव थोरात, गोविंद पडूळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांचे पंकजाताई मुंडे यांनी भाजपचा गमचा घालून स्वागत केले. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, चंद्रकांत देवकते, भीमाशंकर नावंदे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान उजनी ता. अंबाजोगाई येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त साहेबराव माने यांनी देखील काल पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला, त्यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, गणेश कराड, बाळासाहेब माने उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!