Uncategorized

पंकजाताई मुंडे यांनी श्रीक्षेत्र राक्षसभूवन येथे घेतले शनि महाराजांचे दर्शन, आ. लक्ष्मण पवार, आ. माधुरीताई मिसाळ यांचीही उपस्थिती

गेवराई । दिनांक १५।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज श्रीक्षेत्र राक्षसभूवन येथे शनि महाराजांचे दर्शन घेतले.

श्री शनि महाराजांच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी श्रीक्षेत्र राक्षसभूवन हे एक पूर्ण पीठ आहे. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले. पर्वतीच्या (पुणे) आमदार माधुरीताई मिसाळ, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मंदिर संस्थानच्या वतीनं त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!