बीड ।दिनांक १९।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरात घेतलेल्या जनता दरबारात शहर व विविध तालुक्यातील नागरिकांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांच्या समस्या ऐकून घेत पंकजाताईंनी त्यांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा केला.
पंकजाताई मुंडे आज बीड दौऱ्यावर आल्या होत्या. सकाळी त्यांनी भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी जनता दरबार घेतला. बीडसह आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई आदी तालुक्यातील नागरिक आपल्या विविध वैयक्तिक व सार्वजनिक समस्या घेऊन आले होते. या सर्वांची गाऱ्हाणी ऐकून घेत पंकजाताईंनी त्यांच्या समस्यांचा निपटारा जागेवरच केला. काही संघटनांनी आपल्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. पंकजाताईंनी घेतलेल्या या जनता दरबारात तातडीने समस्या मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
••••