Uncategorized

पेठ बीड ठाण्यातून फरार झालेला गुटखा माफिया गजाआड

बीड : पोलीस अधिक्षकांच्या पथकाने पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आरोपी ठाण्यातून गायब झाल्याची घटना परवा रात्री घडली होती. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना आज सकाळी एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केल्याचे सांगण्यात आले.

पोलीस अधिक्षकांच्या पथकाने परवा सायंकाळी पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखोंचा गुटखा पकडून पेठ बीड पोलीसांच्या ताब्यात दिला होता. पेठ बीड ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर आरोपी शेख मोहसीन शेख सलाऊद्दीन आणि शेख एकबाल शेख रशीद हे अचानक गायब झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पेठबीड पोलीसांनी ठाण्यातून आरोपी पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी यातील शेख एकबाल शेख रशीद रा. बार्शी रोड बीड याला पोलिसांनी बीड शहरातून ताब्यात घेतल्याची माहिती डीवायएसपी संतोष वाळके यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!