Uncategorized

धक्कादायक! ८५ वर्षीय आजोबाचा अल्पवयीन नातीवर अत्याचार, दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

दिंद्रुड – माजलगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८५ वर्षीय आजोबाने त्याच्या दहा वर्षीय अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान घडली.

आई शेतात गेल्याचा गैरफायदा घेत आजोबाने घरात शिरत अल्पवयीन नात्यावर अत्याचार केला. ही घटना आईला घरी आल्यानंतर समजली असता तिने दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत गुन्हा नोंद केला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून माजलगाव येथील पिंक पथकाकडे या प्रकरणाचा तपास वर्ग केला असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!