बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्हा पोलिस दलातील 87 एएसआय (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांना गोड बातमी दिली आहे. तब्बल 87 जणांना पीएसआय (पोलिस उपनिरीक्षक) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता 87 जणांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून संबोधण्यात येणार आहे. या सर्व पोलिस अधिकार्यांचे स्वत: एसपींनी अभिनंदन केले आहे.
बीड जिल्हा पोलिस दलातील 87 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बडती देण्यात आली आहे. यामध्ये एएसआय शहादेव पवार, संभय्या आईटवार, शिवाजी गोंडे, भागवत कणके, चंद्रकांत इंगळे, अशोक फुलेवाड, कांता सोनवणे, सत्यवान बळवंते, सोनराव बोडखे, गोविंद बास्टे, संजय कोमटवार, बिभीषण जाधव, चंद्रकांत ठाकूर, शाम जाधव, चंद्रबा आईटवार, अरूण कांबळे, सुनिल वाघमारे, मंदा कोळेकर, भागिनाथ नागरगोजे, वाहेद शेख, मंगलदास करांडे, जगन्नाथ केंद्रे, सुभाष शेटे, बबन कांबळे, बाळासाहेबब काटकर, श्रीराम तपसे, महादेव टिपरसे, बब्रुवान गांधले, अन्वरखान पठाण, शिवाजी पौळ, सुनिल शेटे, मोहम्मद आसिफ मोहम्मद इसाक, हामीद सय्यद, बाळकृष्ण थोरात, कल्याण भंडारे, मुजीब बेग, ब्रम्हनाथ उबाळे, शिवाजी नागरगोजे, शंकर वैष्णव, बाबू मोरे, मोहन गिते, विठुबा गायकवाड, वसंत नागरगोजे, मनोहर अनवणे, दिलीप उगले, शब्बीर शेख, अशोक जाधव, सुरेश सुतार, उत्तम चव्हाण, राजाभाऊ लांडगे, कमलकर गायकवाड, शंकर चक्रे, देविदास सातव, संजय गफाट, अन्वरखान पठाण, विष्णू रोडे, रफीकोद्दीन शेख, राजाराम जाधव, शेख जमील, अजाज शेख, भाऊसाहेब सिरसाट, राजाभाऊ राठोड, रमेश गायकवाड, बाबुराव राठोड, प्रमोद वारे, अब्दुल खदीर अ.अजीज, रशिद शेख, रमेश नागरगोजे, राजकुमार प्रकाश, अब्दुल हानीफ शेख, मधुकर ढाकणे, धर्मराज सोनवणे, सुरेश वाघमारे, सुनिल म्हेत्रे, काशिनाथ राठोड, महादेव गुजर, नारायण साबळे, पोपट अंकुशे, राजू गायकवाड, राजेंद्र पवार, फारूक अहमद कादरी, रमेश मिसाळ, संतोष वजुरकर, सुरेश सानप, अशोक शिंदे, किसन मस्के, सुभाष महाडीक असे 87 एएसआय आता पीएसआय झाले आहेत. या अधिकार्यांच्या गणवेशात आता अतिरिक्त एक स्टार समाविष्ट करण्यात आला आहे. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संबोधण्यात येणार्या सर्व पोलिस अधिकार्यांचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
स्वत: एसपींनी अधिकार्यांच्या गणवेशावर
लावला एक स्टार
87 एएसआय कर्मचार्यांना श्रेणी पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस अधीक्षकांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार त्यांच्या गणवेशावर आणखी एक अतिरिक्त स्टार वाढविण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही कर्मचार्यांना हा अतिरिक्त स्टार पोलिस अधीक्षकांनी आपल्या हाताने लावला आहे.















