Uncategorized

पंकजाताईंच्या मंत्रिपदासाठी मोहटादेवीला साकडे,भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी बीड शहरातून काढली पायी दिंडी, महिलांनी काढलेल्या पायी दिंडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले आहे. त्यामुळे या सरकारमध्ये पंकजाताईंना मंत्री पद मिळावं यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यानुसार गुरूवारी बीड जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्या आणि पंकजाताईंच्या महिला समर्थकांनी बीड ते मोहटादेवी पायी दिंडी काढत ताईंना मंत्रिपद मिळावा यासाठी साकडे घातले. बीडमधून निघालेल्या या दिंडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.
पंकजाताई ह्या एक मासलिडर आहेत, त्यामुळे त्यांना राज्याच्या सरकारमध्ये मंत्री पदाची संधी देणे हे भाजपबरोबरच संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या हिताचे आहे. त्यांना भाजप या सरकारमध्ये नक्कीच संधी देईल, असा विश्‍वास सर्वांना वाटत आहे. वास्तविक पाहता त्यांना मंत्रिपदावर संधी मिळावी म्हणूनच काल भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी बीडमधून मोहटा देवी गडावर पायी दिंडी काढली, ताईंच्या मंत्रिपदासाठी या सर्व महिला पदाधिकार्‍यांनी मोहटा देवीला साकडे घातले आहे. अ‍ॅड संगीता धसे, शैलाताई मुसळे, संजीवनी राउत यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी बीड-नवगण राजूरी, खालापुरी, जांव, आर्वी, येळंब, भालगाव (पाथर्डी),मुंगसवाडे, टाकळी मातूर,मोहटा गाव, मोहटा देवी गडावर पोहचली. या दिंडीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. तर या दिंडीने ज्यावेळी बीडमधून मोहटादेवीकडे प्रस्थान केले त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अ‍ॅड सर्जेराव तांदळे, चंद्रकांत फड, प्रा.देविदास नागरगोजे, जगदिश गुरखुदे, विक्रम हजारी, लक्ष्मण जाधव, हरिश खाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ठिकठिकाणी केले दिंडीचे जंगी स्वागत

पंकजाताईंना मंत्रिपद मिळावे याकरिता गुरूवारी सकाळी भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी बीडवरून मोहटा देवी गडावर पायी दिंडी काढली, बीड ते मोहटा देवी प्रवासादरम्यान या दिंडीचे प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!