परळी ।दिनांक २५।
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेवर रा. स्व. संघ प्रणित पॅनल विजयी झाल्याचा मला आनंद आहे. आगामी काळात शैक्षणिक प्रगतीसह संस्थेची अधिक भरभराट होईल असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत संस्था उत्कर्ष पॅनलला घवघवीत असे यश मिळाले. पॅनलचे २० पैकी १९ उमेदवार चांगल्या मतांच्या फरकाने विजयी झाले. आज या सर्व विजयी संचालकांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले व ऋण व्यक्त केले. यावेळी बोलतांना पंकजाताईंनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उत्कर्ष पॅनलचा विजय हा संघशक्तीचा आहे. पॅनलच्या विजयाने मला आनंद झाला आहे. नवनिर्वाचित संचालकांच्या हातून संस्थेची अधिक भरभराट होईल अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, पद्माकर मुळे, विकासराव डुबे यांच्यासह पॅनलचे विजयी उमेदवार सर्वश्री राम कुलकर्णी, जितेश चापसी, प्रवीण सरदेशमुख, सत्यनारायण लोहिया, शंकरराव लासुणे, डॉ. कल्पना चौसाळकर, डॉ. सुरेंद्र आलुरकर, विष्णू कुलकर्णी, डॉ. हेमंत वैद्य, विजय चाटुफळे, अमरनाथ खुरपे, माणिक भोसले, ज्योती ठाकूर, प्रकाश दुगड, अप्पाराव यादव, संजय गुरव, उमेश जगताप, बाबूराव आडे, विष्णू सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
••••