बीड, दि. 29 : राष्ट्रीय महामार्ग क्रं. 548 B लातूर-अंबाजोगाई मार्गावरील बर्दापूर ते वाघाळा दरम्यानच्या रस्त्याचे तात्काळ चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रीतमताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
त्याअनुषंगाने सडक परिवहन मंत्रालयाशीही त्या पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहेत.
अंबाजोगाई लातूर या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे, वास्तविकता या मार्गावर केवळ बर्दापूरपर्यन्त चार पदरी रास्ता आहे, या पुढे वाघाळा गावापर्यन्त दोन पदरी रस्ता आहे, विशेष म्हणजे या ठिकाणी दुभाजकही नाहीत, परिणामी अपघाताचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे लातूर-अंबाजोगाई मार्गावरील बर्दापूर ते वाघाळा रस्त्याचेही तात्काळ चौपदरीकरण करावे अशी मागणी खासदार प्रीतमताईंनी नितीन गडकरींकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला गडकरी नक्कीच हिरवा कंदील दाखवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.