Uncategorized

बेलूर्‍यातील महिलेवर गँगरेप !
गँगरेप करणार्‍या नराधमांनी अश्‍लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी, बीड ग्रामीण ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : ‘तुझे अश्‍लिल व्हिडीओ आमच्याकडे आहेत, ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून तिघांनी एका 24 वर्षीय महिलेवर गँगरेप केला आहे, पहिल्या दिवशी त्या पीडितेवर नात्याने चुलत पुतण्या असलेल्या तरूणाने बलात्कार केला तर दुसर्‍या दिवशी अन्य तीन नराधमांनी त्याच पीडितेवर अत्याचार केले, याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात बेलूर्‍यातील एका नराधमावर बलात्काराचा तर तिघांवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बीडच्या काटवटवाडीत घडलेल्या या सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संतोष वाळके, बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे आणि पीएसआय राजपुत यांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला असून याप्रकरणातील आरोपींचा बीड ग्रामीण पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता.
बेलूरा (ता.बीड) येथील एका 24 वर्षीय महिलेने सोमवारी दोन घटनेसंदर्भात बीड ग्रामीण ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ‘मी पुणे येथे माझे पती, दोन मुलं व सासु असे एकत्रित वास्तव्य करते, माझे लग्न सन 2012 मध्ये झालेले असून माझे पती लाईनवरील ट्रक्टरवर चालकाचे काम करतात. दि. 4 एप्रिल 2022 रोजी माझ्या पतीने मला दारुच्या नशेत मारहाण केली होती, त्यामुळे मी त्याच दिवशी रागाच्याभरात बसने माझ्या माहेरी निघुन आले होते. माहेरी आल्यावर आईने तु ऐकटीच का आली, तु परत तुझ्या नवर्‍याकडे जा’ असे सांगीतले, त्यावर मी बीडमध्ये येवून माझ्या मैत्रीणीकडे काही दिवस राहिले. पुढे 11 एप्रिल 2022 रोजीच्या रात्री आकराच्या सुमारास मी बीडहुन पुण्याला जाण्यासाठी सपना ट्रॅव्हल्समध्ये बसले, पुण्याला जात असताना जामगाव येथे आल्यावर मला माझा चुलत पुतण्या अजय गवते याने त्याच्या मोबाईलवरून (क्र 9172248940) फोन आला, मला काकांनी तुम्हाला घेवुन यायला सांगीतले आहे. तुम्ही नगरला चांदनी चौकात उतरा, मी तेथे थांबलो आहे, असे त्याने यावेळी सांगितले. त्यानुसार मी अडीचच्या सुमारास चांदणी चौकात उतरले असता अजय गवते हा त्याच्याकडील दुचाकी घेवुन आला आणि त्याने मला दुचाकीवर बसायला सांगितले. आता रात्र झाली आहे, आपण सकाळी पुण्याला जावु असे म्हणुन मला अजयने चांदणी चौकाजवळ असलेल्या एका लॉजवर ( नाव माहीत नाही ) घेवून गेला. तेथे त्याने मला लाँजवरील रुम (क्र 301) मध्ये नेले. व आपण आज येथेच झोपू असे म्हणुन मला एक ग्लास ज्युस पिण्याकरिता दिले. ते पिल्यानंतर मला गुंगी आली, याठिकाणी गुंगीत झोपल्यानंतर काही वेळाने अजयने मी झोपेत असताना माझ्या अंगावर येथुन माझ्या अंगातील कपडे बळजबरीने काडुन माझ्यावर अतिप्रसंग केला. यावेळी मी ज्युस पिल्याने मला काही समजत नव्हते व अशकतपणाही मला आला होता. तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच 12 एप्रिल रोजी सकाळी आकरा वाजता अजयने त्याच्या मोबाईलमध्ये मला न सांगता काडलेले माझे अश्‍लिल फोटो दाखविले, तेव्हा मी त्याला ते डिलीट करायला लावले. नंतर त्याने मला चांदणी चौकात आणुन सांगीतले की, काका सध्या बाहेर गावी गेले आहेत. तुम्ही आता परत बीडला जाश असे म्हणुन अजयने मला जिपमध्ये बसवुन दिले. मी दि. 12 एप्रिल 2022 रोजी बीडच्या आयोध्या नगरमधील माझ्या बहीणीच्या घरी गेले. यावेळी माझ्या पोटात दुखत असल्याने मी बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल झाले होते. दवाखान्यात असतांना बेलुरा गावातील दत्ता मुरली गवते याचा मोबाईल (क्र. 7775054430) यावरुन फोन करून सांगीतले की, तुम्हचे आणि अजयचे अश्‍लिल व्हीडिओ माझ्याकडे आहेत. असे म्हणुन मला ब्लॅकमेल करायाला लागला व तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल असे म्हणून माझ्याकडे आला. व आता रात्र झाली आहे तुम्ही माझ्या घरी चला असे सांगीतल्याने मी त्याच्या दुचाकीवर बसुन काठवटवाडी येथे रात्री दहा वाजता आले असता दत्ता गवते याने दुचाकी काठवटवाडी फाट्यावरुन खाली वळवल्याने मी त्यास सांगीतले की गाडी कुठे नेत आहे असे विचारले असता इकडुन जावु असे सांगीतले. यावेळी आमच्या दुचाकीच्या पाठीमागुन आणखी एक दुचाकी येत होती. व त्यावर दोन जण बसले होते. दत्ता गवतेने काही अंतरावर दुचाकी ओढ्याजवळ थांबवीली, तेव्हा दत्ता गवते याने मागुन येणारी दुचाकी व येणारा परमेश्‍वर नारायण गवते यास बोलावुन दोघांनी मला धरुन बाजुच्या शेतातील विहीरीजवळ घेवून गेले. तेथे दोघांनी मला खाली पाडुन माझे हातपाय धरून लगेच फोन करुन पप्पु नरहारी गवते यास बोलावुन घेतले. पप्पु गवते तेथे आल्यावर दत्ता व परमेश्‍वर मला धरुन ठेवले व पप्पु गवते यानी माझ्यासोबत अतिप्रसंग केला. नंतर दत्ता गवते व परमेश्‍वर गवते हे दोघेजण माझ्यासोबत छेडछाड करीत होते. रात्रभर तिघांनी मला मारहाण करत छेडछाड केली. दुसर्‍या दिवशी सकाळी पाच वाजता दत्ता व परमेश्‍वरने मला गाड़ीवर मध्येभागी बसवुन नवगण राजुरी येथील बसस्टॉपवर सोडले. दि. 12 एप्रिल रोजी दुपारी सिदोड येथे माझ्या आईकडे आले. आणि दोन ठिकाणी घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. पुढे ही घटना मी 19 एप्रिल रोजी माझ्या नवर्‍याला सांगितली असता त्यांनी मला पोलीस ठाण्यात तक्रर देण्यास सांगीतले, म्हणून मी बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली, असे पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार बीड ग्रामीण ठाण्यात आरोपी अजय भाऊसाहेब गवते याच्यावर बलात्काराचा तर पप्पू उर्फ प्रकाश नरहरी गवते, दत्ता मुरलीधर गवते, परमेश्‍वर नारायण गवते (सर्व रा. बेलूरा ता.बीड) या तिघांवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.प्रकरणाचा अधिक तपास एपीआय योगेश उबाळे हे करीत आहेत.

घटनास्थळाला वाळकेंसह
वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली भेट
याप्रकरणी चौघांवर कलम 376 फ, 376 ड, 323, 506 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संतोष वाळके, बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे आणि पीएसआय राजपुत यांच्या इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे त्या बलात्कार्‍यांना पकडण्यासाठीही शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!