बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : मागच्या 21 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई 25 एप्रिल रोजी बेनकल्ली येथे करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक , औरंगाबाद परिक्षेत्र , औरंगाबाद यांनी बीड जिल्हयाचे वार्षीक तपासणीचे दरम्यान पाहिजे व फरार आरोपीचा आढावा घेवून बीड जिल्हा अभिलेखावरील संख्या कमी करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन व स्था.गु.शा. यांना पाहिजे व फरार आरोपी अटक करणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सध्या जिल्ह्यात पाहिजे व फरार आरोपीतांना अटक करण्याची विशेष मोहिम चालू आहे. दि. 24 एप्रिल रोजी एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , आरोपी नामे राजु हनुमंत म्हेत्रे (रा . बेनकल्ली जि . बिदर कर्नाटक राज्य ) हा बेनकल्ली येथे असल्याची माहिती मिळालेवरुन स्था.गु.शा. चे एक पथक सदर ठिकाणी रवाना केले. सदर पथकाने बिदर, बसवकल्याण, हुमनाबाद, गुलबर्गा ( कर्नाटक राज्य ) येथे जावून आरोपीची माहिती काढली असता सदरील आरोपी हा बेनकल्ली येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी जावून, दि. 25 एप्रिल 2022 रोजी सापळा रचून आरोपी नामे राजु हनुमंत म्हेत्रे (वय 48 वर्षे रा . बेनकल्ली जि . बिदर कर्नाटक राज्य) यास शिताफीने ताब्यात घेतले. सदरील आरोपीस पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर गु.र.नं. 248 / 1997 कलम 48 9 ( ब ), 489 ( क ), 48 9 ( ड ) , 420 , 201, 34 भादंवि गुन्हयात पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर येथे हजर केले आहे. सदरील आरोपी हा त्यास गुन्हयात शिक्षा झाल्यानंतर गेल्या (21) वर्षापासून फरार होता. तो त्याचे अस्तीत्व बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता . त्याने अद्याप पावेतो पोलीसांना गुंगारा देवून तो फरार होता. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.















