Uncategorized

माझ्या नवर्‍याला फोन का करतेस, बीडमध्ये नर्सला उसाच्या फोकाने मारहाण, मारहाण करणार्‍या महिलेवर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : ‘‘माझ्या नवर्‍याला फोन का करतेस, तुझा नंबर देत’ असे म्हणत बीडमधील एका खासगी रूग्णालयातील एका नर्सला एका महिलेने ऊसाच्या फोकाने मारहाण केली, ही घटना जिजामाता चौकातील एका हॉस्पीटलमध्ये गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. याबाबत सदर नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेविरोधात बीड शहर ठाण्यात कलम 223, 504,506 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा बाळू कुलथे असे बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाळवंडी नाका परिसरात वास्तव्यास असलेली एक तीस वर्षीय नर्स जिजामाता चौकातील एका खासगी रूग्णालयात काम करते, गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास आरोपी माहिला सदर रूग्णालयात दाखल झाली, येथे आमुक आमुक नर्स कोण आहे, याची विचारणा करून आरोपी महिला त्या नर्सजवळ गेली, तु माझ्या नवर्‍याला फोन का करतेस, तुझ्या नंबर मला दे, असे आरोपी महिलेने म्हटले, त्यावर मी तुम्हाला नंबर देणार नाही, असे त्या नर्सने यावेळी सांगितले. या सगळ्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी महिलेने त्या नर्सला ऊसाच्या फोकाने मारहाण करण्यास सुरूवात केली. घडलेल्या या घटनेमुळे सदर रूग्णालयात काही तास तणावाचे वातावरण होते, यासंदर्भात सदर नर्सने बीड शहर ठाणे गाठून आपली रितसर तक्रार दिली आहे. या तक्रारीवरूनच आरोपी महिलेविरोधात कलम 323, 504,506 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास एएसआय चक्रे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!