बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून जिल्हा परिषदेची टोलेजंग इमारत बांधली. या इमारतीत खा.डॉ. प्रीतमताई मुंडे उद्या येणार असून या ठिकाणी होणार्या जल जीवन मिशन अंतर्गत बैठकीस त्या मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान खा.प्रितमताई झेडपीच्या इमारतीत येत असल्याने भाजपच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सत्तेच्या काळात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. यातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून जिल्हा परिषदेची नूतन इमारत ही त्यांच्याच काळात मंजूर झालेली आहे. या टोलेजंग इमारतीसाठी पंकजाताई यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता. सध्या या टोलेजंग इमारतीत जिल्हा परिषदेचा कारभार सुरू झाला आहे. उद्या सोमवार दि.18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता खा. प्रितमताई मुंडे प्रथमच झेडपीच्या टोलेजंग इमारतींत प्रवेश करणार आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत बैठकीस त्या अधिकार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. खा. प्रितमताई प्रथमच झेडपीच्या इमारतीत प्रवेश करणार असल्याने भाजपच्या वतीने त्यांचे प्रवेशद्वारावरच जोरदार स्वागत करण्यात येणार असून उद्या सोमवार दि.18 एप्रिल रोजी सकाळी 11वाजता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.