तेलगाव, दि.13 (लोकाशा न्यूज) : चैञ एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलच्या दर्शनासाठी गेलेल्या परभणी जिल्ह्यातील भाविकांच्या पीकअप जीप,ऊस ट्रॅक्टर, मोटारसायकल असा तिहेरी अपघात तेलगाव माजलगाव रस्त्यावर निञुड नजीक होऊन, यात दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.तर सहा जण गंभीर जखमी झाले. एवढा मोठा भिषण अपघात होऊन ही तब्बल एक तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांनी पोलीसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
या अपघातात केशव चंद्रभान डाके रा.डाके पिंप्री ता.माजलगाव हे मोटारसायकल क्र.एम.एच.44आर.7936 वरून माजलगाव कडुन तेलगाव कडे येत असताना त्यांच्या समोर ऊसाचेट्रॅकटर चालत होते. याच वेळी तेलगाव कडुन माजलगाव कडे भाविकांची पीकअप क्र.एम.एच.16एवाय.2602 येत होते.यावेळी वाहनचालकांचा वाहनांवरील ताबा अचानक निसटल्याने हा भिषण तिहेरी अपघात झाला. हा अपघात एवढा भिषण व ह्रदयद्रावक होता की मोटारसायकल पुर्णपणे चक्कनाचुर झाली यात मोटारसायकल चालक केशव चंद्रभान डाके तसेच पीकअप मधील एक भावीक त्यांचे नाव समजु शकले नाही. हे जागीच ठार झाले. यामयतांचे रक्त रस्त्यावर सांडले होते.तसेच विठ्ठल खुरसणे, उध्दव रोकडे, विशाल गायकवाड, रामभाऊ पवार आदि जखमी झाले. सर्व जखमींना 108रूग्ण वाहिकेने माजलगाव रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी अपघाताची माहिती समजताच निञुड येथील गोपाळ कुलकर्णी, शेख आतिक, द्ता गिराम, रामदिप डाके, अजित डाके आदि ग्रामस्थांनी अपघातातील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून मदत केली. तर अपघात होऊन एक तासापेक्षा जास्त कालावधी होऊन ही दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. त्यामुळे अपघातस्थळी पोलीसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता.