बीड,
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी व दै.न्याय टाईम्सचे संपादक बालकिशन सोनी यांना एमसीएम टीव्ही व श्री साईसागर इंटरमेंट नवी मुुंबईच्या वतीने देण्यात येणारा स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार जाहीरझाला असून शनिवार दि.9 एप्रिल रोजी पनवेल येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. दरम्यान या पुरस्काराबद्दल सोनी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी व दै.न्याय टाईम्सचे संपादक बालकिशन सोनी यांना 2022 या वर्षाचा स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एमसीएम टीव्हीच्या वतीने हा पुरस्कार दिला जात असून मुख्य संपादक जनार्धन शिंदे यांनी याबाबतचे पत्र संपादक बालकिशन सोनी यांना दिले आहे. सामाजिक, राजकिय कार्याची दखल घेत तसेच ओबीसी आरक्षण, उद्योग तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे परिक्षण करून हा पुरस्कार बालकिशन यांना दिला जात आहे.शनिवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटय गृह, नवी मुंबई, पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान मला मिळणारा पुरस्कार हा मी आपल्या सर्वांसाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव असून आपली दखल घेवून चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांना समाज राजमान्यता देतो या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी व संपादक बालकिशन सोनी यांनी पुरस्काराचे अभिनंदन करून त्याबद्दल एमसीएम टीव्ही चे आभार व्यक्त केले आहेत.