Uncategorized

पंकजाताईंमुळे शेतकर्‍यांना मिळणार लढण्याची उर्जा, उद्या अंबाजोगाईत होणार सोयाबीन, ऊस मित्र मेळावा


अंबाजोगाई, दि. 7 (लोकाशा न्यूज) :  ऊस, सोयाबीन कारखाने व सरकार यांची जी सध्याची अवस्था आहे. ती समजून घेण्यासाठी त्यावर योग्य ते उपाय शोधण्यासाठी सोयाबीन, ऊस मित्र मेळावा उद्या दि. 8 एप्रिल रोजी घेण्यात येणार असून यात सोयाबीन,ऊस मित्र मेळाव्यात या संदर्भातील सर्व प्रश्‍नांवर विचार विनिमय करण्यात येणार आहे. हा मेळावा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याची माहिती अच्युत गंगणे यांनी दिली आहे. आद्यकवी सांस्कृती मुकुंदराज सभागृहात न.प. अंबाजोगाई येथे हा मेळावा आयोजित केला असून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होईल. आ.नमिता मुंदडा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील तर बी.बी.ठोंबरे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. हा मेळावा दुपारी 1 च्या दरम्यान होणार असून या मेळाव्यास व्यापारी, कारखाना, मिल्स, ऑग्रो प्रॉडक्स व बचत गट आदी व्यवसायाशी संबंधीत बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन नारायण पांडे, शामराव आपेट, जीवनराव किर्दंत, गणेश कराड, इस्माईल शेख, शिवाजी गित्ते, बंडु चाटे, संतोष भगत, मेघराज सोमवंशी, बाबुभाई पटेल, गोविंद तारसे, दत्ता जाधव, गोविंद जामदार, अविनाश मोरे, संजय गिराम, दत्ता जाधव, प्रदिप गंगणे, विलास जगताप, नेताजी देशमुख, संभाजी रेड्डी, व्यंकट कासले, गणेश भोसले, राम चव्हाण, वसंत शिंदे, शशि गौरशेटे, अ‍ॅड.सचिन सोळंके, विनोद लहाने, सतिष केंद्रे, प्रशांत दहिफळे आदींनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!