Uncategorized

जालना रोड, बार्शी रोडची दैना लवकरच फिटणार,आ.संदीप क्षीरसागरांनी केली प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवात

बीड: गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्ता असलेल्या बार्शी नाका ते जालना रोडची चाळण झाली होती.अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत नागरीकांमधून मागणी होत होती.शनिवारी (दि.१२) रोजी आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांनी या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली.यामुळे या रस्त्याची वर्षानुवर्षे झालेली दैना फिटून नागरीकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
बीड शहरातील मुख्य असलेला बार्शी नाका ते जालना रोडची अक्षरशः चाळण झाली होती.धूळ आणि खड्ड्यांमुळे या रस्त्यावर प्रवास करणे नको-नको झाले होते.यामुळे नागरिकांमधून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाऊल उचलत शनिवारी (दि.१२) रोजी सायंकाळी स्वतः जाऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली.या रस्ताकामांतर्गत शहरातील,जालना रोडवरील काकू-नाना हॉस्पिटल पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, राष्ट्रवादी भवन ते बार्शी रोडवरील बिंदूसरा पूलपर्यंत या शहरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण काढून, CONCRETE FIXED FORM PAVER या अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने दर्जेदार सिंमेट रस्ता तयार करण्यात येणार आहे.या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिक सुटकेचा श्वास घेणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!