राक्षसभुवन दि लोकाशा न्युज ः गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन शनिचे याठिकाणी अवैध वाळूचे उत्खनन करणाऱ्या जेसीबी व दोन हायवावर पोलिस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने कारवाई केली आहे यामध्ये जवळपास एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराम राक्षसभूवन शनिचे याठिकाणी गोदापात्रात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आर राजा यांच्या विषेश पथकाचे प्रमुख ए पी आय गणेश धोक्रट , पो ना अन्वर शेख , पो ना गोविंद काले , पो ना सचिन पाटेकर , यांना महिती मिळाली यावरून या पथकाने गोदापात्रात छापा मारला असता वरिल ठिकाणी वाळू उपसा करणाऱ्या एक जेसीबी व दोन हायवा घटनास्तळावरून ताब्यात घेण्यात आला असुन या कारवाईत तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील वाहने जप्त करून पुढील कारवाई करण्यासाठी चकलांबा पोलिस ठाण्यात पुढील कारवाईसाठी लावण्य आल्या असल्याची माहिती आहे .















