Uncategorized

शेतकर्‍यांच्या ऊसाचं एकही टिपरू शिल्लक राहणार नाही, बजरंग बप्पा अन् येडेश्वरी साखर कारखान्याचा संकल्प, एकमेव येडेश्‍वरी कारखाना जिल्ह्यातून ऊसाचा मोठा भार ओढू लागला


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : या वर्षी उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे आणि केज तालूक्यातील व परिसरातील एकमेव येडेश्वरी साखर कारखाना चालू असल्यामुळे वाढत्या उसाच्या क्षेत्रासाठी शेतकरी पुत्र जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांचा साखर कारखाना केज तालुक्यातील व परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे, कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्यामुळे अहोरात्र उसाचे गाळप सध्या चालू असून शेतकर्‍यांच्या उसाला भावही चांगलाच मिळत आहे. त्यामुळे परिसरातील उसामुळे चिंतातूर असणार्‍या शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसू लागले आहे. यावरूनच बजरंग बप्पांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना तारले असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे कितीही लोढ आला तरी शेतकर्‍यांच्या ऊसाचं एकही टिपरू शिल्लक ठेवणार नसल्याचा संकल्प बजरंग बप्पा आणि येडेश्‍वरी कारखान्याने केलेला आहे.
सध्याच्या काळात जिल्ह्यात एकमेव येडेश्वरी साखर कारखाना गतीने गाळप करत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंता दूर होत असून चिंता दूर करण्याचे काम शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे करीत आहेत, शेतकरी असल्यामुळे, शेतकर्‍यांच्या प्रश्नांची, अडचणीची, जाण असलेलं नेतृत्व म्हणजे बजरंग सोनवणे, उसाच्या कामात कुठलेही राजकारण न आणता, सभासद असो किंवा नसो, सर्वांना समान न्याय देवून आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या उसाचे टिपरूसुद्धा शिल्लक न ठेवण्याचा बजरंग सोनवणे यांचा मानस आहे. मतदार संघाच्या परिसरात इतर कारखाने असून अडचण नसून खोळंबा या प्रमाणे त्यांची आवस्था सुरु आहे, अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांच्या उसाला रास्त भाव देणार असल्याचे येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोणवने यांनी चंग बांधलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून न जाता धीर सोडू नये, सर्व शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप केले जाईल कुणाचाही उस शिल्लक राहणार नाही उसाच्या बाबतीत कुठलेही राजकारण होणार नाही, सभासद, बिगर सभासद, छोट्या मोठ्या सर्व शेतकर्‍यांचा उस नोंदी प्रमाणे नेहणार असल्याचे येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांनी म्हटले आहे. कारखाना परिसरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या तालूक्यातील शेतकर्‍यांचा उस सुद्धा येडेश्वरी कारखाना गाळप करणार आहे, अगदी पाऊस पडेपर्यंत कारखाना चालू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. येडेश्‍वरी एकमेव असा कारखाना आहे, की तो जिल्ह्यातून ऊसाचा मोठ्या प्रमाणात लोढ ओढू लागला आहे. या सर्व सकारात्मक गोष्टींमुळेच शेतकर्‍यांसाठी आहोरात्र झटणारा नेता म्हणजे शेतकरी पुत्र बजरंग सोणवनेच असल्याची चर्चा जिल्हाभरातील शेतकरी वर्गातून होत आहे. सध्याच्या भयाणक अशा संकटातही जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बप्पांनी तारले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!