Uncategorized

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनला सीईओंकडून गती, 208 सार्वजनिक शौच्छालयांसाठी चार कोटी 36 लाख रूपयांचा निधी केला मंजूर



बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : सीईओ अजित पवार हे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कामाला गती देत आहेत. त्यांनी जिल्ह्यात घराघरात पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी जलजिवन मिशनचे मोठे काम हाती घेतलेले आहे. याबरोबरच त्यांनी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनलाही मोठी गती दिल्याचे समोर येत आहे. कारण जिल्ह्यात त्यांनी 208 सार्वजनिक शौच्छालयांसाठी तब्बल चार कोटी 36 लाख 80 हजार रूपये मंजूर करून ते थेट ग्रामपंचायतींना वितरीतही केले आहेत.
एखाद्या विभागाला अधिकारी चांगला मिळाला तर त्या विभागाची कामे चोखपणे आणि गतीने पुर्ण होतात, अगदी असे सकारात्मक विचार ठेवून काम करणारा अधिकारी सीईओ अजित पवार यांच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषदेला मिळाला आहे. स्वत:च्या टेबलावर एकही फाईल पेंडीग राहणार नाही यापध्दतीने ते प्रत्येक कामाला गती देत आहेत. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर आठवडड्यातील काही घंटे ते स्वत: फिल्डवर जावून होत असलेल्या कामांची पहाणीही करतात, यामुळेच बीड जिल्ह्यातील अनेकांना खर्‍या अर्थाने न्याय मिळत आहे. जल जिवन मिशन अंतर्गत घराघरात नळाव्दारे पाणी देण्याची केंद्र सरकारने मोठी योजना हाती घेतलेली आहे. जिल्ह्यात याच योजनेला सीईओ अजित पवार गती देत आहेत. विशेष म्हणजे त्यांना प्रत्येक गाव चांगलं, सुंदर आणि स्वच्छ करण्याचा पुर्वीपासूनच छंद आहे, त्यामुळेच बीड जिल्ह्यातीलही अनेक गावे स्वच्छ आणि सुंदर करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. याअनुषंगानेच स्वच्छ भारत मिशन टप्प्पा दोन अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी त्यांनी 208 सार्वजनिक शौच्छालयांना मंजूरी दिली आहे. यासाठी लागणार चार कोटी 36 लाख 80 हजार रूपयांचा निधीही संबंधित ग्रामपंचायतींना त्यांनी वितरीत केला आहे. यावरूनच सीईओंच्या कामातील गतिमानता संपूर्ण जिल्ह्याला पहायला मिळत आहे. दरम्यान त्यांना या कामामध्ये जि.प.च्या स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी पावलोपावली सहकार्य करत आहेत.

तालुकानिहाय शौच्छालयांना मिळालेला निधी
तालुका शौच्छालयांची संख्या मंजूर निधी
बीड 35 73 लाख 50 हजार
आष्टी 25 52 लाख 50 हजार
अंबाजोगाई 21 44 लाख 10 हजार
धारूर 11 23 लाख 10 हजार
गेवराई 26 54 लाख 60 हजार
केज 24 50 लाख 40 हजार
माजलगाव 18 37 लाख 80 हजार
पाटोदा 12 25 लाख 20 हजार
परळी 19 39 लाख 90 हजार
शिरूर 09 18 लाख 90 हजार
वडवणी 08 16 लाख 80 हजार
एकूण 208 चार कोटी 36 लाख 80 हजार

निधी गावा-गावापर्यंत पोहचविण्यास
झेडपी अध्यक्षांना मोठे यश
एक विकासात्मक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून मागील अडीच वर्षांपासून जि.प.च्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट ह्या धडाडीने काम करीत आहेत. सत्तेच्या अडीच वर्षात त्यांनी अनेक विकासात्मक कामे जिल्ह्यातील कानोकोपर्‍यात पोहचविलेले आहेत. ‘स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होत असलेल्या या कामातही त्यांची भुमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत गावागावापर्यंत निधी पोहचविण्यास झेडपी अध्यक्षांना मोठे यश येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!