Uncategorized

२१ वर्षापासून फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडला


बीड, मा . विशेष पोलीस महानिरीक्षक , औरंगाबाद परिक्षेत्र , औरंगाबाद यांनी बीड जिल्हयाचे वार्षीक तपासणीचे दरम्यान पाहिजे व फरार आरोपीचा आढावा घेवून बीड जिल्हा अभिलेखावरील संख्या कमी करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत . त्या अनुषंगाने मा . पोलीस अधीक्षक , बीड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन व स्था.गु.शा. यांना पाहिजे व फरार आरोपी अटक करणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या . त्या अनुषंगाने जिल्हयात पाहिजे व फरार आरोपीतांना अटक करण्याची विशेष मोहिम चालू आहे . दिनांक २८/०१/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , आरोपी नामे सायमन बाबुराव कोडीकर रा . लालवाडी बिदर , चितापूर जिल्हा गुलबर्गा ( कर्नाटक राज्य ) हा हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळालेवरुन स्था.गु.शा. , चे एक पथक सदर ठिकाणी रवाना केले . सदर पथकाने हैद्राबाद येथे जावून आरोपीची माहिती काढली असता सदरील आरोपी हा लिंगापल्ली रेल्वेस्टेशन , हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळालेवरुन सदर ठिकाणी जावून , दिनांक ३१/०१/२०२२ रोजी सापळा रचून आरोपी नामे सायमन बाबुराव कोडीकर वय ४६ वर्षे रा . लालवाडी बिदर , चितापूर जिल्हा गुलबर्गा ( कर्नाटक राज्य ) यास शिताफीने ताब्यात घेतले . सदरील आरोपीस पोलीस ठाणे , अंबाजोगाई शहर गु.र.नं. २४८ / १ ९९ ७ कलम ४८ ९ ( ब ) , ४८ ९ ( क ) , ४८ ९ ( ड ) , ४२० , २०१ , ३४ भादंवि गुन्हयात पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे , अंबाजोगाई शहर येथे हजर केले आहे . सदरील आरोपी हा त्यास गुन्हयात शिक्षा झाल्यानंतर गेल्या ( २१ ) वर्षापासून फरार होता . तो त्याचे अस्तीत्व बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता . त्याने अद्याप पावेतो पोलीसांना गुंगारा देवून तो फरार होता . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!