Uncategorized

अतिक्रमणरहित नकाशा देण्यासाठी लाच मागणारा भुमापक एसीबीच्या जाळ्यात, झेरॉक्स सेंटर चालकही गजाआड


गेवराई, दि. 9 (लोकाशा न्यूज) : अतिक्रमणरहित नकाशा देण्यासाठी लाच मागणार्‍या येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या भुमापकासह झेरॉक्स सेंटरच्या चालकास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई 9 डिसेंबर रोजी एसीबीचे डीवायएसपी भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईमध्ये करण्यात आली आहे.
असदखान बिबनखान पठाण (वय-51,मु रा. सिरसाळा) असे
लाचखोर भूमापक (भूमी अभिलेख कार्यालय,गेवराई) आणि मयुर कांबळे
(वय 34 रा संजयनगर, गेवराई) असे झेरॉक्स सेंटरच्या चालकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या शेतजमीनवर 23 गुंठे अतिक्रमण झाले होते, मोजणी करून, अतिक्रमणरहित नकाशा देण्यासाठी लाचखोर भुमापकाने लाच मागितली होती, यापुर्वी साडे तीन हजार घेतले आणि गुरूवारी एक हजार रूपये घेताना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्यावर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीवायएसपी भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!