Uncategorized

18 ग्रा.पं.मधील ग्रामस्थांच्या आंदोलनाची खा. प्रीतमताईंनी गंभीरपणे घेतली दखल, तेरा किमीचा रस्ता दर्जेदार करण्यासाठी तात्काळ 13.50 कोटी रूपये उपलब्ध करून द्या, खा. मुंडेंची ना. अशोक चव्हाणांकडे मागणी



बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत, त्यामुळेच बीड तालुक्यातील 18 ग्रामपंचयतींमधील ग्रामस्थांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते, या आंदोलनाला सर्वात आधी खा. प्रीतमताईंनी भेट देवून त्यांची मागणी जाणून घेतली होती, त्यानुसार सदर प्रश्‍नाची गांभीर्याने दखल घेवून खा. मुंडे यांनी आता या रस्त्यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना एक पत्र पाठविले आहे. बीड-म्हाळसजवळा-ईट-पिंपळनेर-सुरडी फाटा (रामा क्र.55) असा 13.5 किमीचा रस्ता खराब झालेला आहे. हा दुरूस्त करण्यासाठी 13.50 कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि जनभावना लक्षात घेवून या रस्त्यासाठी तात्काळ निधी मंजूर करावा, केवळ डागदुजी करण्यापेक्षा ग्रामस्थांना दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे असे खा. मुंडेंनी ना. अशोक चव्हाणांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!