Uncategorized

तिन पक्षाचे सरकार तरीही विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब ! अरे स्वत: निधी आणलेल्या कामांचीच उद्घाटने करा, तुम्हाला कोणीही अडवणार नाही, खा. प्रीतमताईंनी सत्ताधार्‍यांना लगावले टोले, गेवराई पंचायत समितीची नवी ईमारत लोकसेवेत, बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांना बारामतीचेच अधिक प्रेम – आ. लक्ष्मण पवार, टक्केवारीत न अडकता, जनतेशी प्रमाणीक राहून काम करणारा मराठवाड्यातला पहिला आमदार म्हणजे लक्ष्मण पवार – जगताप, जे.डी.शहांचीही सत्ताधार्‍यांवर खरमरीत टिका


गेवराई, दि. 25 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारतीसाठीचा निधी तत्कालीन पालकमंत्री तथा आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी दिला होता, असे असताना ही, सत्ताधारी उद्घाटनासाठी जीवाचा आटापिटा करून दबाव आणून बेगाने शादी मे…च्या भूमिकेत वावरत आहेत. राज्यात तुमचे सरकार आहे. निधी आणा अन् करा ना उद्घाटने, कोणी अडवलंय, असा उपरोधिक चिमटा खा. प्रीतमताई मुंडे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना काढला. आमचे दबंग आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांनी सत्ताधार्‍यांचे सगळे मनसुबे उधळून लावल्यानेच, या भव्य इमारतीचे उद्घाटन होऊ शकले, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. दरम्यान, सरकार तिन पक्षाचे आहे. तरी, विकासाच्या नावाने बोंब आहे. जी काही विकासाची कामे सुरू आहेत. ती सर्व केंद्र सरकारची आहेत. त्यामुळे, राज्यात सत्ता नसली तरी, घाबरण्याचे काही कारण नाही. हे ही दिवस जातील. कारण, संघर्ष जीतना बडा, जित उतनी ही बडी होगी, असे सांगून, गेवराई पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्की यश मिळेल, असा विश्वासही यावेळी खा. प्रीतमताईंनी व्यक्त केला.
गेवराई पंचायत समितीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा, गुरूवारी खासदार डॉ. प्रितमताई मुंडेंच्या हस्ते पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार लक्ष्मण पवार, छञपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहन जगताप, सर्जेराव तांदळे, सभापती कल्पना दिपक सुरवसे, उपसभापती संदिप लगड, जे. डी. शहा, स्वप्नील गलधर, सलिम जहागीर, जि. प. सदस्य रामराव खेडकर, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड सुरेश हाते, भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष रत्नमाला मोटे, प्रा पी. टी. चव्हाण, बापुराव चव्हाण, परमेश्वर वाघमोडे, जि. प. सदस्य प्रल्हाद माने, पुजाताई मोरे,रंजना नागरे, अमोल तिपाले, शाम कुंड, राजेंद्र भंडारी, पांडुरंग थडके, बंडू बारगजे यांची उपस्थिती होते. पुढे बोलताना खा. मुंडे म्हणाल्या की, नव्या इमारतीत ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न निकाली काढून नवा इतिहास निर्माण करा आणि पुन्हा एकदा बहुमताने पंचायत समितीवर भाजपाची सत्ता स्थापन करा, त्यासाठी येथील जनता आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे ही त्यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण पवार यावेळी बोलताना म्हणाले की,दैठणच्या पंडितांनी जे केले ते आम्ही केले नाही. विकासाच्या वाटा आडवायच्या आणि लोकांना वेठीस धरायचे धोरण पंडीतांनी राबविल्याचा आरोप केला. तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या निधीतून बीड जिल्ह्यातील विकास होऊ शकला. त्याचे उपकार म्हणून, आज गेवराई पंचायत समितीची इमारत उभी राहीली असल्याचे सांगून, नपने एनओसी दिल्याचेही आ. पवार म्हणाले. आघाडी सरकार केवळ बारामती, सांगली, कोल्हापूरसाठी आहे. मराठवाड्यातील निधी त्यांनी तिकडे नेला, पंडित गप्प बसून बघत आहेत. गेवराई पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरीब समाजातील सर्व घटकांना चाळीस हजार घरकुल देण्याची योजना असून, त्या योजनेत कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणार असल्याचे ही आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी मोहन जगताप, जेडी शहा यांची भाषणे झाली. टक्केवारीत न अडकता, जनतेशी प्रमाणीक राहून काम करणारा मराठवाड्यातला पहिला आमदार म्हणजे लक्ष्मण पवार आहेत. एवढा प्रमाणीक, इमानदार आणि रोखठोक संवाद साधून स्वतःची ओळख निर्माण करणारे आ. पवार यांना आपण नेहमीच साथ देऊ असे सांगितले. बहारदार सुत्रसंचालन राहुल गिरी, आभार जिप सदस्य पांडुरंग थडके यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!