Uncategorized

पंकजाताई मुंडेंचा परळीत जनतेसोबत ‘दिवाळी फराळ’,स्थानिक रहिवाशांच्या समस्याही घेतल्या जाणून

परळी । दि.१२ ।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील नागरीकांच्या कौटुंबिक भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसेच त्यांचेसमवेत दिवाळी फराळाचाही आस्वाद घेतला. परळीकरांशी असलेले ऋणानुबंध फराळ आणि स्नेहभेटीच्या निमित्ताने अधिक घट्ट झाले असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. दरम्यान या भेटीत त्यांनी नागरिकांकडून वॉर्डातील समस्याही जाणून घेतल्या.

शहरातील शिवाजी नगर,सुभाष चौक,गणेशपार,सावता माळी मंदिर परिसर भागातील नागरीकांच्या पंकजाताई मुंडे यांनी आज भेटी घेतल्या.यावेळी त्यांनी दिवाळी फराळासोबत विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. स्नेहभेटी निमित्त पंकजाताईंचे घरोघरी उत्साहात स्वागत झाले ,तर महिला-भगिनींनी औक्षण करून आनंद व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, प्रकाश जोशी, जयश्री मुंडे, महादेव इटके, संदीप लाहोटी, राजेंद्र ओझा,
बालासाहेब कराळे, मोहन जोशी, पवन मोदाणी, प्रितेश तोतला, सचिन गिते, गणेश होळंबे, प्रल्हाद सुरवसे, अरूण दौंड, बाळू फुले, पवन तोडकरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!