बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : प्रश्न कोणताही असो..तो सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वयक सौ. प्रज्ञा खोसरे ह्या आपली टीम घेवून सदैव तत्पर असतात. वाढत्या महागाई विरोधातही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर आणि आ. संदीप भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली
बीड जिल्ह्यामध्ये गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांमार्फत त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना आपल्या मागण्यांचे पत्र पाठविले आहे. जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे अॅड प्रज्ञा खोसरे यांनी म्हटले आहे.
2014 मध्ये देशातील जनतेला व विशेषतः महिला भगिनींना महागाई कमी करतो म्हणून मतदानाचा आशिर्वाद मागत भाजप सत्तेत आली. नरेंद्र मोदींचे सरकार आपल्या अच्छे दिनच्या वचनाला जागत दिवाळी-भाऊबिज निमित्त ओवाळणी म्हणून वचनपूर्ती करत गॅस-सिलेंडर, तेल, दाळी, इंधन स्वस्त करून बाजारातील महागाई कमी करावी हिच देशातील महिला-भगिणीनां दिवाळी-भाऊबिज निमित्त भेट राहिल, अश्या आशयाचे एक पत्र देशांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या़ंच्यापर्यंत पोहचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपा पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व पक्ष नेतृत्वाना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाड़ीच्या वतीने निवेदन पत्रांची प्रत देत अनोखे आंदोलन करण्यात आले, व महागाईचा गांधीगिरी स्टाईलने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी पक्ष-कार्यालय येथे बीजेपी कार्यालयात निवेदन देण्यात आले व त्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोच करण्याची विनंती केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वयक सौ. प्रज्ञा खोसरे, बीड शहराध्यक्षा रेहानाताईं पठाण, कार्याध्यक्षा सौ.अनिताताई वाघमारे तसेच सौ तीबोले ताई, जिल्हा-सचिव राणीताई शेख इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित आंदोलन केले.















