Uncategorized

गावठी पिस्टल बाळगणारे 2 आणि मोटर सायकल चोर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


बीड, दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार बीड जिल्हा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सतीष वाघ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की . हॉटेल साई प्रसाद शिवाजी चौक , गेवराई येथे वैजिनाथ भाऊसाहेब थोरे रा . शिवाजीनगर , गेवराई नावाचा इसम उभा असुन तो विनापरवाना बेकायदेशीर रित्या त्याचे कंबरेला गावठी पिस्टल लावुन थांबलेला आहे . अशी माहिती मिळाल्याने स्थागुशा चे अधीकारी व अमलदार यांना बातमीची ठिकाणी पाटुन त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करुन पो.स्टे . गेवराई येथे गुरनं 496/2021 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रामणे गुन्हा दाखल केला आहे . तसेच पो.स्टे . बीड शहर येथे इसम नामे विजय सखाराम गायकवाड रा.माळापुरी यांच्याकडुन एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त करून पोस्टे बीड शहर गुरनं 208/2021 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदया गुन्हा नोंद करण्यात आला आ सदर कारवाई करत असताना सरकारी दवाखाना , बीड समोरुन मोटर सायकल चोरी करणारा संशईत इसम नामे शेख अमीर शेख समीयोदीन रा झमझम कॉलनी , बीड यास ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्यांने सांगितले की , मी सरकारी दवाखाना , बीड येथुन तीन मोटर सायकल चोरी केल्या आहे असे सांगितल्यावरुन त्यांच्याकडुन 03 मोटर सायकल किंमत 1,30,000 रु चा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे . बीड शहर येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहे . सदरची कामगीरी वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमलदारांनी केली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!