बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : गुन्हे घडणार नाहीत याची आम्ही पावलोपावली काळजी घेत आहोत, त्यामुळे घाबरू नका, जिल्हा पोलिस दल सुरक्षेसाठी 24 तास तुमच्या सेवेत आहे, असा विश्वास बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी दिला आहे. गुन्ह्यात जप्त मुद्देमाल शनिवारी श्री. लांजेवार यांच्या हस्ते फिर्यादींना सन्मानपुर्वक परत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमधील जप्त असलेला किंमती मुद्येमाल निर्गती करण्यासाठी पोलीस अधिक्षक राजा रामा स्वामी यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी पासून अपर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावरील प्रलंबीत किंमती मुद्देमालाची माहिती घेऊन फिर्यादींना संपर्क करुन त्यांच्या मार्फतीने संबंधी मा. न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर किंमती मुद्येमाल फिर्यादीस परत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये 23 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व प्रक्रिया पुर्ण करुन फिर्यादींना अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या हस्ते सन्मानपुर्वक देण्यात आला. पो.ठा.परळी ग्रामीण गुरनं . 48 / 2009 कलम 394 , 34 भादंवि मधील मंगळ सुत्रातील आठ मणि किं. 8000 / – रु.चा माल फिर्यादीचा मुलगा अशोक शामराव अंधारे (रा. दादाहरी वडगांव ता . परळी) यांना देण्यात आला. पो.स्टे. नेकनूर गुरनं. 16 / 2019 कलम 392 भादंवि मधील 5 ग्रॅम सोन्याची बदामी अंगठी पिवळ्या रंगाची किं. 15000 / – रु.चा माल फिर्यादी गणपत प्रभु तागड (रा. लिंबागणेश ता. जि. बीड) यांना देण्यात आला. पो.ठा.शिरुर गुरनं.24 / 2021 कलम 454,380 भादंवि मधील सोन्याचे दागिने मणि मंगळसुत्र, सोन्याची नथ व नगदी 4000 / – रु . असे एकुण 24000 / – रु.चा माल फिर्यादी नामे राजाराम भिमराव जोगदंड (रा. कमळेश्वर घानोरा , ता . शिरुर) यांना देण्यात आला. सदर फिर्यादीस मुद्देमाल सन्मानपुर्वक परत करण्याची प्रक्रिया मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. स्था . गु.शा. बीड , पो.ह. नारायण जाधव अपोअ.वाचक आणि कार्यालयातील पोह . अनिल मिसाळ यांनी पुर्ण केली आहे.















