परळी (दि. 23) —- : आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे जाऊन गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत दर्शन घेतले.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वतीने यावेळी परळीत ठिकठिकाणी व पांगरी (गोपीनाथगड) येथे ना. भुजबळ यांचे फटाके,हार,फेटा,ढोल, ताशाच्य गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ना. छगन भुजबळ हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथमच परळी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी नगर परिषदेतील गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्यासह सहकाऱ्यांनी ना. भुजबळ यांचे जंगी स्वागत केले.
यावेळी न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड , शिवाजी सिरसाट, न.प.सभापती गोविंद मुंडे, अनवर मिस्कीन, नगरसेवक विजय भोयटे , शंकरराव अडेपवार, रवि मुळे, भिमराव डावरे, परळी पं.स.सभापपती पिंटू मुंडे, कृ.उ.बा.समिती सदस्य सुर्यभान मुंडे, प.स.सदस्य वसंत तिडके,सटवाजी फड, सरपंच कांताभाऊ फड , विश्वनाथ देवकते, प्रभू अंधळे उपसरपंच श्रीनिवास मुंडे, रा.काँ.युवक अध्यक्ष गोविंद कराड, दत्ता कराड, बंडु गुट्टे, बालाजी मुंडे यांसह आदी उपस्थित होते.















