Uncategorized

मुंडे भगिणी ऊसतोड कामगारांच्या खंबीरपणे पाठीशी, मयत ऊसतोड कामगार सागरबाई जाधव यांच्या कुटूंबियांची भेट घेवून कृष्णा तिडकेंनी केले सांत्वन


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : मागच्या चार दिवसांपुर्वी कर्नाटकमधील यादवाड साखर कारखान्यावर जात असताना धारूबा घाटात ट्रॅक्टरचा अपघात झाला या अपघातात ऊस तोड मजुर सागरबाई सुंदर जाधव (वय 35 वर्ष रा आस्वलआंबा तंडा ता परळी) यांचा मृत्यु झाला. त्यांच्या परिवारात पती, मुलगा, मुलगी, सासु, सासरा असा परिवार आहे. लोकनेत्या पंकजाताई आणि खा. प्रीतमताई यांच्या आदेशानुसार या ऊसतोड कामगाराच्या कुटूंबियांची ऊसतोड कामगार संघटनेचे कृष्णा तिडके यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.  पुढील पोलीस प्रशासन व कारखान्याची ईंशुरेशची काहीही आडचण आलीतर ताईसाहेब व संघटना आपल्या सोबत आहे, असे सांगुन त्यांचे सांत्वन केले, यावेळी कृष्णा तिडके,लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोड मजुर व मुकदम वाहातुकदार संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष यांच्या सोबत,सरपंच नितीन भैय्या ढाकणे,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष भैय्या सोळके,संघटनेचे तालुका अध्यक्ष नारायन तांबडे, ग्रामपंचात सदस्य चिंतामन जाधव, ग्रामपंचायत सदस्य बालासाहेब जाधव,दत्ता भैय्या गिराम,शंकर जाधव,शरद जाधव,रामकिसन ढाकणे,विठ्ठल जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!