Uncategorized

पंकजाताई मुंडे यांचा उद्यापासून दोन दिवस मध्यप्रदेशात लोकसभा पोटनिवडणूक प्रचार दौरा,खंडवा लोकसभा क्षेत्रात होणार सहा जाहीर सभा

मुंबई ।दिनांक २१।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे उद्यापासून दोन दिवस म्हणजे २२ व २३ ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशातील खंडवा लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार दौर्‍यावर जात आहेत. खंडवा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या विविध विधानसभा क्षेत्रात सहा जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

पंकजाताई मुंडे उद्या २२ रोजी सकाळी ७ वा. मुंबईहून विमानाने इंदौरला जाणार आहेत. इंदौर येथून हेलिकॉप्टरने त्यांचा हा प्रचार दौरा असणार आहे. या दौऱ्यात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हे त्यांचेसमवेत असणार आहेत.

खासदार नंदकुमार चौहान यांच्या निधनामुळे खंडवा लोकसभेची जागा रिक्त झाली होती, त्याठिकाणी आता पोटनिवडणूक होत असून येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. पंकजाताई मुंडे यांचा खंडवा मतदारसंघाचा प्रचार सभांचा दोन दिवसीय दौरा पुढीलप्रमाणे – २२ ऑक्टोबर सकाळी ११ वा. – खकनार, दुपारी १ वा. – दर्यापूर (सभा), दुपारी 3 वा. नेपानगर ( अनुसूचित जाती वर्गाचे संमेलन) २३ ऑक्टोबर सकाळी ११ वा. – मुंदी (मांधाता), दुपारी १२ वा. सभा – सतवाडा (भीकनगांव), दुपारी १.३० वा. – झिरन्या (भीकनगांव) (सर्व सभा)
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!