Uncategorized

बापानेच केला दारुड्या लेकाचा खून, एएसपी कविता नेरकर यांनी पोलीस यंत्रणा सतर्क करताच केजमधील ‘ त्या ‘ खुनाचा झाला उलगडा


केज : तालुक्यातील दैठणा येथील एका ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह गावातील एका रस्त्याच्या कडेला गवतात आढळून आला होता . केज पोलिसांना अवघ्या १२ तासांच्या आत या खुनाचा उलगडा करण्यात यश आले असून बापानेच दारुड्या लेकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे . विलास चंद्रकांत मुळे ( वय ३८ , रा . दैठणा ) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे . बुधवारी विलासचा मृतदेह गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळून सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गवतात आढळून आला होता . मृतदेहावर गंभीर जखमा पाहता हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय होता . याबाबत माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , सहा . पोलीस अधीक्षक पंकज कुमानत यांच्यासह केजचे सहा . पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे , पीएसआय दादासाहेब सिद्धे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . मयत विलास हा दारूच्या आहारी गेलेल्या होता . परंतु , त्याचे गावात कोणाशीच वैर अथवा टोकाचे भांडण नव्हते . त्यामुळे त्याचा खून कुणी केला याचा तपास करणे पोलिसांसाठी अवघड झाले होते . तपासासाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली .

चंद्रकांतला नाष्टा महागात पडला
या खुनाचे कसलेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते . मात्र , मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचा पिता चंद्रकांतचा ( वय ६० ) निर्विकार चेहरा पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही . त्यातच मृतदेहाचा पंचनामा सुरू असताना चंद्रकांतने हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा केला . यामुळे पोलिसांचा चंद्रकांतबद्दल संशय अधिक बळावला. अंत्यविधी आटोपताच पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेतले . त्याची कसून चौकशी करताच त्याने खुनाची कबुली दिली . मयत विशाल हा दारू पिण्याच्या सवयीचा होता व तो घरात नेहमी आई वडील आणि नातेवाईका सोबत भांडण करीत असे . त्यामुळे चंद्रकांतने वैतागून धारदार शस्त्र त्याच्या डोक्यात मारले . घाव वर्मी बसल्याने विशालचा मृत्यू झाला असे तपासातून समोर आले .

सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांचे कौतुक : कुठलाही पुरावा नसताना केवळ आरोपीच्या देहबोलीवरून पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली . त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या केज पोलिसांचे कौतुक होत आहे . तपासात अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शंकर वाघमोडे , पीएसआय दादासाहेब सिद्धे , सहा . फौजदार कादरी , पोलीस जमादार शिवाजी शिनगारे , अशोक नामदास , अनिल मंदे , जसवंत शेप , शेख , शेषेराव यादव , हंबे ,केज : तालुक्यातील दैठणा येथील एका ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह गावातील एका रस्त्याच्या कडेला गवतात आढळून आला होता . केज पोलिसांना अवघ्या १२ तासांच्या आत या खुनाचा उलगडा करण्यात यश आले असून बापानेच दारुड्या लेकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे . विलास चंद्रकांत मुळे ( वय ३८ , रा . दैठणा ) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे . बुधवारी विलासचा मृतदेह गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळून सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गवतात आढळून आला होता . मृतदेहावर गंभीर जखमा पाहता हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय होता . याबाबत माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , सहा . पोलीस अधीक्षक पंकज कुमानत यांच्यासह केजचे सहा . पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे , पीएसआय दादासाहेब सिद्धे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . मयत विलास हा दारूच्या आहारी गेलेल्या होता . परंतु , त्याचे गावात कोणाशीच वैर अथवा टोकाचे भांडण नव्हते . त्यामुळे त्याचा खून कुणी केला याचा तपास करणे पोलिसांसाठी अवघड झाले होते . तपासासाठी श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली .

.

पोलिसांचे कौतुक

कुठलाही पुरावा नसताना केवळ आरोपीच्या देहबोलीवरून पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली . त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या केज पोलिसांचे कौतुक होत आहे . तपासात अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शंकर वाघमोडे , पीएसआय दादासाहेब सिद्धे , सहा . फौजदार कादरी , पोलीस जमादार शिवाजी शिनगारे , अशोक नामदास , अनिल मंदे , जसवंत शेप , शेख , शेषेराव यादव , हंबे आणि दिलीप गित्ते यांनी महत्वाची भूमिका बजावली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!